संरक्षक दलाच्या अध्यक्षपदी आंबेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:27 AM2021-01-17T04:27:08+5:302021-01-17T04:27:08+5:30
शास्त्री महाविद्यालयात नामविस्तार दिन साजरा परतूर : येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन ...
शास्त्री महाविद्यालयात नामविस्तार दिन साजरा
परतूर : येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. सदाशिव मुळे, प्रा. डॉ. दिलीप मनवर, उपप्राचार्य डॉ. रवि प्रधान, संभाजी तिडके, दशरथ देवडे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
दुनगाव दर्गा गावामध्ये दोन गटात हाणामारी
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील दुनगाव दर्गा गावात शनिवारी दुपारी किरकोळ कारणामुळे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या मारहाणीत जहीर कासम सय्यद, समीर महेबुब पठाण हे दोघे जखमी झाले. जखमींवर अंबड येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळास गोंदी पोलीस ठाण्याचे पोनि. शितलकुमार बल्लाळ यांनी भेट दिली. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता.
वरूडीत भाजीपाला विक्री केंद्राचे उद्घाटन
बदनापूर : तालुक्यातील वरूडी येथील शेतकरी गटाने सुरू केलेल्या भाजीपाला व फळ विक्री केंद्राचे उद्घाटन कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आत्माचे संचालक किसन मुळे, विभागीय कृषी संचालक डी. एल. जाधव, प्रकल्प संचालक बाळासाहेब शिंदे, उपसंचालक विजय माईनकर, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के आदींची उपस्थिती होती.
अवजड वाहतूक पाचोडमार्गे वळविली
अंबड : ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळपासून शहरातील तहसील कार्यालयात होणार आहे. या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरातून होणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. जालना येथून येणारी वाहने पाचोड नाका, अंबड -पाचोड- वडीगोद्री या मार्गाने व बीडकडून येणारी वाहने वडीगोद्री ब्रीज- पाचोड - पाचोडनाका, अंबड- जालना अशी वळविण्यात आली आहेत.