... अन् लोणीकरांनी बैठक अर्धवट सोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:36 AM2019-01-26T00:36:51+5:302019-01-26T00:36:55+5:30

दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात एका शेतकऱ्याने त्यांच्या मागणीसाठी शुक्रवारी विष प्राशन केल्याची घटना घडली. त्यानंतर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जालन्यात होणा-या भाजपच्या बैठकी निमित्त येणा-या महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा आणि व्यवस्थे संदर्भात आढावा बैठक घेतली.

... and Lonikar left the meeting partially | ... अन् लोणीकरांनी बैठक अर्धवट सोडली

... अन् लोणीकरांनी बैठक अर्धवट सोडली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात एका शेतकऱ्याने त्यांच्या मागणीसाठी शुक्रवारी विष प्राशन केल्याची घटना घडली. त्यानंतर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जालन्यात होणा-या भाजपच्या बैठकी निमित्त येणा-या महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा आणि व्यवस्थे संदर्भात आढावा बैठक घेतली.
यावेळी प्रशासनाने त्यांना घटना सांगितली की, नाही हे माहिती नव्हते, परंतु बैठक सुरू असताना पत्रकारांनी शेतक-यांच्या विष प्राशसना संदर्भातील माहिती अधिका-यांकडून जाणून घेण्यासाठीची विनंती करणारा निरोप पालकमंत्री लोणीकरांना दिल्यावर त्यांनी लगेचच ही आढावा बैठक रद्द केली.
शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एका दत्तू कळकुंबे यांनी त्यांच्या शेतीच्या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या मुद्यावरून थेट निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या दालनात विष घेतले. या घटनेची माहिती प्रशासनाने पालकमंत्री लोणीकरांना दिली होती की नाही, याची कल्पना नसल्याचे दिसून आले. लोणीकरांनी नेहमी प्रमाणे आढावा बैठक घेण्यास प्रारंभ केला. परंतु घटनेचे गांभीर्य जाणून घेण्यासह कळकुंबे यांनी हे विष नेमके कशामुळे घेतली, ही माहिती देण्यास कोणताच जबाबदार अधिकारी उपलब्ध नव्हता, याची माहिती थेट लोणीकरांना दिल्याने त्यांनी बैठक आटोपती घेतली.

Web Title: ... and Lonikar left the meeting partially

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.