सर्व्हर डाऊनमुळे केंद्रचालक, उमेदवारांचे जागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:17 AM2020-12-28T04:17:06+5:302020-12-28T04:17:06+5:30

वडीगोद्री : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, गावागावात राजकीय वातावरण तापले आहे. मागच्या निवडणुकीत विरोधक असलेले गाव ...

Awakening of candidates due to server down | सर्व्हर डाऊनमुळे केंद्रचालक, उमेदवारांचे जागरण

सर्व्हर डाऊनमुळे केंद्रचालक, उमेदवारांचे जागरण

Next

वडीगोद्री : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, गावागावात राजकीय वातावरण तापले आहे. मागच्या निवडणुकीत विरोधक असलेले गाव पुढारी कुठे एक झाले तर एक असलेले पुढारी आता विरोधी झालेले चित्र पहावयास मिळत आहे. यात तरुण पिढी अधिक रस घेत आहे. काही ग्रामपंचायती बिनविरोध काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात सर्व्हर डाऊनमुळे सर्व उमेदवार रात्री जागरण करून नोंदणी करत आहेत.

अंबड तालुक्यात १११ ग्रामपंचायती असून, त्यातील ७१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहेत. तालुक्यातील सुखापुरी, वडीगोद्री, हसनापूर, रोहिलागड, किनगाव, दह्याला, बारसवाडा, बळेगाव, एकलहरा, वाळकेश्वर, साष्ट पिंपळगाव, लालवाडी, रामनगर, गोंदी, डावरगाव, धाकलगाव, दुनगाव, चंदनापुरी बुद्रूक, शहापूर, शहागड, पारनेर, नांदी, मठ पिंपळगाव, महाकाळा, खडकेश्वर, करंजाळा आदी ७१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत आहेत.

ग्रामपंचायत निवडणूक असल्यामुळे नामनिर्देशनपत्र भरण्याची लगबग सुरू झाली आहे. नामनिर्देशनपत्र ऑनलाईन नोंदणी करताना सर्व्हर डाऊन होत आहे. त्यामुळे अनेकांना संगणकासमोर ताटकळत बसावे लागत आहे. दिवसा सर्व्हर डाऊन झाल्याने रात्री दोन-तीन वाजेपर्यंत जागरण करून अर्ज भरले जात आहेत. ऑनलाईनमुळे उमेदवार मेटाकुटीला आले असून, गाव सोडून अंबड शहरात दोन-दोन दिवस रात्रभर ऑनलाईन अर्ज भरण्याचे काम करावे लागत आहे. यात महिला उमेदवारांना याचा नाहक त्रास होत आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने गावा-गावात राजकीय डावपेच रंगले आहेत. काही ठिकाणी गावपातळीवर बिनविरोध गाव करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कोट

निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, सर्व्हर डाऊनमुळे वेळेत अर्ज भरला जात नाही. इच्छुक अर्ज भरण्यासाठी रात्री उशिरापर्यंत थांबत आहेत. याचा महिलांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर करण्याची गरज आहे.

ज्ञानेश्वर छल्लारे

ई-सेवा केंद्रचालक, वडीगोद्री

Web Title: Awakening of candidates due to server down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.