बँकेचे आडमुठे धोरण; शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 01:12 AM2018-06-29T01:12:00+5:302018-06-29T01:12:35+5:30

बँके च्या आडमुठ्या धोरणाने शेतकरी अडचणीत सापडला असून, या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश कुमार जेथलिया यांनी केली आहे.

Bank's bizarre strategy; Farmers suffer | बँकेचे आडमुठे धोरण; शेतकरी त्रस्त

बँकेचे आडमुठे धोरण; शेतकरी त्रस्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : बँके च्या आडमुठ्या धोरणाने शेतकरी अडचणीत सापडला असून, या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश कुमार जेथलिया यांनी केली आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. आॅनलाईन नोंदणी होउन याद्याही तयार करण्यात आल्या मात्र या मध्ये अनेक त्रुटी राहिल्या. यामुळे अद्याप साठ टक्के शेतक-यांची नावेच कर्जमाफीच्या यादीत आली नाहीत. त्यामुळे शेतक-यांना नवीन पीककर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत. शेतकरी बँकांचे उंबरठे झिजवत आहेत, मात्र त्यांना कर्ज मिळेनासे झाले आहे. पीकविमा, बोंड अळीचेही अनुदानातही गोंधळ झाला आहे. शेतकºयांना अद्याप कोणतेच अनूदान मिळाले नाही. राष्ट्रीयकृत बँकेत दललांची चलती असल्याने शेतकºयांना बँकेचे अधिकारी ‘डायरेक्ट’ येणा-या शेतकºयांना कर्ज देण्यास टाळा - टाळ करीत आहेत. या सर्व बाबींच्या विरोधात काँग्रेसकडून लवकरच जनआंदोलन करण्यात येणार असल्याचे जेथलिया म्हणाले.

Web Title: Bank's bizarre strategy; Farmers suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.