गणेश फेस्टिव्हलच्या माध्यमातून मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:56 AM2018-09-13T00:56:01+5:302018-09-13T00:56:21+5:30
यंदाच्या जालना गणेश फेस्टिव्हलनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात अनेक दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी जालनेकरांना मिळणार आहे. अशी माहिती जालना गणेश फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय लाखे , अध्यक्ष साईनाथ पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : यंदाच्या जालना गणेश फेस्टिव्हलनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात अनेक दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी जालनेकरांना मिळणार आहे. अशी माहिती जालना गणेश फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय लाखे , अध्यक्ष साईनाथ पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
मंडप उभारणीसह अन्य काही कामे ही अंतिम टप्प्यात आहे. शुभारंभाच्या दिवशी म्हणजे १४ सप्टेंबर रोजी अमृताचिया गोडी हा आठशे वर्षाचा मराठी कवितेचा प्रवास उलगडणारा हा परिवर्तन जळगाव निर्मित काव्य मैफिलीचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर १५ सप्टेंबर रोजी प्रसिध्द कलावंत उदय साटम निर्मित गंध मातीचा हा कार्यक्रम होणार असून १६ सप्टेंबरला अनिल जाधव निर्मित धुमाकूळ हा कार्यक्रम होईल. तर १७ रोजी अप्सरा आली हा अर्चना सावंत निर्मित कार्यक्रम होणार आहे. तर १८ रोजी न्यजूलेस कवितेचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी कवी शामसुंदर सोन्नर, रचना बोराडे, प्रशांत डिग्गरकर, पंकज दळवी, सुरेश ठमके, भीमराव गवळी, सुनील तांबे यांचा समावेश राहणार आहे. १९ रोजी चंद्रकांत काळे निर्मित संत तुकारामांचे जीवन हे अभंगातून विशद करण्यात येणार आहे. २० रोजी सकाळी स्वामी समर्थ केंद्र- दिंडोरीचे नितीनभाऊ मोरे हे मार्गदर्शन करतील.