पारध ते धामणगाव रस्त्यावरून भाजप-शिवसेनेत श्रेयाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:39 AM2019-01-26T00:39:43+5:302019-01-26T00:40:26+5:30

लोकसभा निवडणुकलीला अद्याप तीन महिने शिल्लक आहेत, असे असतानाच भाजप आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई चांगलीच रंगली आहे.

Battle for credit in BJP-Shiv Sena for Paradh to Dhamangaon road | पारध ते धामणगाव रस्त्यावरून भाजप-शिवसेनेत श्रेयाची लढाई

पारध ते धामणगाव रस्त्यावरून भाजप-शिवसेनेत श्रेयाची लढाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन/पारध : लोकसभा निवडणुकलीला अद्याप तीन महिने शिल्लक आहेत, असे असतानाच भाजप आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई चांगलीच रंगली आहे. निमित्त आहे ते पारध ते धामणगाव या दोन किलोमीटर रस्ता कामाच्या डांबरी करणाचे! गुरूवारी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आ. संतोष दानवे यांच्या हस्ते पार पडले. तर शुक्रवारी याच रस्त्याचे उद्घाटन शिवसेनेचे कार्यकर्ते संजय खोतकर यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा पारध ते धामणगाव हा दोन किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्याची अत्यंत दयनयी अवस्था ही गेल्या काही वर्षापासून आहे. या संदर्भात लोकमतने वेळोवेळी आवाज उठवला होता. त्याची दखल घेऊन प्रारंभी आ. संतोष दानवे यांनी २०१८ च्या अर्थसंकल्पात या कामासाठी चार कोटी २५ लाख रूपयांची निधी मंजूर करून घेतला आणि त्याचे उद्घाटनही गुरूवारी केले.
यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष राजेंद्र देशमुख, माजी सभापती परमेश्वर लोखंडे, अशोक लोखंडे, गणेश लोखंडे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, या रस्त्यासह गोळेगाव, आन्वा, जळगाव सपकाळ, पारध आणि धामणगावसाठी साडेचार कोटी रूपये प्राप्त झाल्याचे आ. दानवे यांनी सांगितले.
विशेष म्हणजे या रस्त्याचे काम अर्जुन खोतकरांनी करून दाखवावे असे आवाहन खा.रावसाहेब दानवे यांनी गेल्या आठवड्यात केले होते. जर हे काम स्वत: खोतकरांनी केले तर, आपण लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर वक्तव्य केले होते. त्यामुळे हे वक्तव्य शिवसेनेच्या जिव्हारी लागले. त्यांनी लगेचच दानवेंचे आव्हान स्वीकारून शुक्रवारी थेट पारध येथे जाऊन शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच राज्यमंत्री अर्जुन खोतकरांचे बंधू संजय खोतकर, मनिष श्रीवास्तव, सुरेश तळेकर, नवनाथ दौड आदींच्या उपस्थितीत सकाळी स्वखर्चातून हे काम करण्याचे आव्हान स्वीकारून त्याचे नारळ फोडले. तसेच हे काम करण्यासाठी एक ट्रक खडीचा रस्त्यावर आणून टाकला.
ही माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठांना कळविताच भाजपने देखील बांधकाम विभागाच्या अभियंत्यासमोर खडीचे दोन ट्रक आणून टाकले. या दरम्यान अभियंत्यास धक्काबुक्की करून वर्क आॅर्डर दाखवा आणि नंतरच खडी टाकावी असे सांगितले. त्यामुळे वाद होऊन हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले होते. मात्र नंतर यात पोलिसांनी कोणती भूमिका घेतली, हे समजू शकले नाही.

Web Title: Battle for credit in BJP-Shiv Sena for Paradh to Dhamangaon road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.