गावाच्या विकासासाठी आई व्हा- पेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:30 AM2019-08-11T00:30:52+5:302019-08-11T00:31:40+5:30

आपल्या गावाच्या विकासासाठी सरपंचाने त्या गावाची आई होणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदाचे सरपंच भास्करराव पाटील यांनी मांडले.

Be the mother for the development of the village- Pere | गावाच्या विकासासाठी आई व्हा- पेरे

गावाच्या विकासासाठी आई व्हा- पेरे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : आपल्या गावाच्या विकासासाठी सरपंचाने त्या गावाची आई होणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदाचे सरपंच भास्करराव पाटील यांनी मांडले.
परतूर येथे लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात स्व. बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कारासाठी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची निवड करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आ. राजेश टोपे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव कपिल आकात, उपाध्यक्ष कुणाल आकात, प्रा. डॉ. अशोक देशमाने, प्रा. डॉ. सर्जेराव जिगे, प्रचार्य डॉ भगवान दिरंगे, डॉ. भारत खंदारे हे होते. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना सरपंच पेरे पाटील म्हणाले, सरपंचाने गावची आई होणे गरजेचे आहे. आई मुलाला खायला सर्व चांगले देते. परंतु तरीही ते मूल खात नाही. मग आई त्याला अनेक सायास करून खाऊ घालते. तसेच गावकऱ्यांना चांगले कामही रूचत नाही. ते त्यांना पटवून सांगून आपल्याला गावचा विकास करायचा असतो. मी सातवी शिकलो पण आज देशभर फिरून अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देत आहे. गावात अनेक योजना राबवल्या. त्यामुळेच गावकºयांनीही माझ्यावर विश्वास टाकला. आपल्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे केलं तर निश्चितच यश मिळते, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमास डॉ. संजय काळबांडे, संचालक अशोक आघाव, आसाराम लाटे, माऊली लाटे, सरपंच महेश आकात, डॉ. सुधाकर जाधव, उपप्राचार्य संभाजी तिडके, डॉ. सदाशिव मुळे, डॉ. रवी प्रधान, प्रबंधक दशरथ देवडे, सरपंच कणसे, ओंकार काटै, बद्री खवणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
खेड्यांच्या विकासात देशाचा विकास- टोपे
आ. राजेश टोपे म्हणाले की, खेड्यांच्या विकासात देशाचा विकास आहे. पाण्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम शिक्षण मिळाले ेपाहिजे. कौशल्य व ज्ञान याची सांगड घालता आली पाहिजे, असेही टोपे म्हणाले. प्रास्ताविकात सभापती कपिल आकात यांनी स्व. बाबासाहेब आकात स्मृती पुरस्कार सुरू करण्यामागची पार्श्वभूमी सांगून क र्तबगार व गुणवान व्यक्तीलाच हा पुरस्कार मिळाला पाहिजे. पुरस्कार प्रदान करणारी व्यक्तीही त्याच तोडीची असली पाहिजे.
नीतिमत्ता ठेवून कमवा
सरपंचांना खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ जुळवता येत नाही. हे करीत असताना कर वसुलीही महत्त्वाची आहे. चांगले काम करताना सर्वांनाच त्रास होतो.
त्रास जास्त होऊ लागला की, समजून घ्या, आपला मार्ग बरोबर आहे. त्यामुळे काही वेळा सर्व नीतीचाही अवलंब करा मात्र आपल्या गावाचा विकास करा.

Web Title: Be the mother for the development of the village- Pere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.