प्रल्हाद लुलेकर यांच्या ग्रंथाला भूमिजन साहित्य पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:58 AM2021-02-05T07:58:06+5:302021-02-05T07:58:06+5:30

संशोधन परिषदेचा ‘भूमिजन साहित्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. दलित आत्मकथने, साठोत्तरी साहित्य प्रवाह, मराठवाड्यातील साहित्य, बारा बलुतेदार आणि ...

Bhumijan Sahitya Award for Pralhad Lulekar's book | प्रल्हाद लुलेकर यांच्या ग्रंथाला भूमिजन साहित्य पुरस्कार

प्रल्हाद लुलेकर यांच्या ग्रंथाला भूमिजन साहित्य पुरस्कार

Next

संशोधन परिषदेचा ‘भूमिजन साहित्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

दलित

आत्मकथने, साठोत्तरी साहित्य प्रवाह, मराठवाड्यातील साहित्य, बारा बलुतेदार आणि गावगाडा, परिवर्तनवादी चळवळी व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या विषयाच्या प्रा. प्रल्हाद लुलेकर यांनी केलेला अभ्यास मराठी साहित्यात महत्त्वाचा मानला जातो. अलीकडे त्यांचा ‘बहुजन संस्कृतीचे जनक: महात्मा

जोतीराव फुले’ हा ग्रंथ प्रसिध्द झाला आहे. महात्मा फुले यांनी बहुजन समूहांच्या आयुष्यात घडवून आणलेली क्रांती आणि त्यांच्या संस्कृती निर्माणासाठी घेतलेल्या भूमिकांचा वस्तुनिष्ठ परामर्श प्रा. प्रल्हाद लुलेकर यांनी प्रस्तुत ग्रंथातून घेतलेला आहे. या ग्रंथाला भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषदेचा ‘भूमिजन साहित्य पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण १० मार्च

रोजी ‘भूमिजन साहित्य संमेलना’च्या उद्घाटन समारंभात करण्यात

येईल, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. शिवाजी हुसे, सचिव दिलीप बिरुटे आणि

अध्यक्ष डाॅ. सर्जेराव जिगे यांनी दिली.

Web Title: Bhumijan Sahitya Award for Pralhad Lulekar's book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.