दुकानासमोर उभी केलेली दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:20 AM2021-06-19T04:20:50+5:302021-06-19T04:20:50+5:30

कारची दुचाकीला धडक : दोघे जखमी जालना : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना जालना-औरंगाबाद रस्त्यावरील चंदनझिरा येथे ३१ ...

Bicycle lamps parked in front of the shop | दुकानासमोर उभी केलेली दुचाकी लंपास

दुकानासमोर उभी केलेली दुचाकी लंपास

Next

कारची दुचाकीला धडक : दोघे जखमी

जालना : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना जालना-औरंगाबाद रस्त्यावरील चंदनझिरा येथे ३१ मे रोजी घडली. या अपघातात दोघेजण जखमी झाले आहे. चालक कार घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी कैलास श्रीपत शिंदे यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास मनापोकॉ. वाघमारे हे करीत आहेत.

सेवली येथून दुचाकी चोरी

जालना : तालुक्यातील सेवली येथील शारिया क्लिनिकसमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १५ जून रोजी घडली. या प्रकरणी गुलाब कदम यांच्या फिर्यादीवरून सेवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

परतूर येथे दुकान फोडलेे

जालना : दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी तीन लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना १७ जूनच्या मध्यरात्री वाटूर फाटा येथे घडली.

विकास गजानन अग्रवाल यांचे वाटूर फाटा येथे अग्रवाल फर्निचर ॲण्ड सेल्स नावाचे दुकान आहे. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले होते. मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील तीन लाख ९० हजार रुपयांच्या एलईडीटीव्ही व इतर साहित्य चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी विकास अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एपीआय ठाकरे हे करीत आहेत.

मानदेऊळगाव येथून चार बैल चोरीस

जालना : मानदेऊळगाव शिवारातील गोठ्यात बांधलेले चार बैल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १७ जून रोजी घडली. या प्रकरणी सुधाकर देविदास बावणे यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास तागवाले हे करीत आहेत.

डायनामाे चोरी : गुन्हा दाखल

जालना : शेतातील विहिरीवरील जुन्या मोटरमधील डायनामाे चोरट्याने चोरून नेल्याची घटना अंबड शिवारात गुरुवारी (दि. १७) मध्यरात्री घडली. या प्रकरणी विश्वनाथ बाबासाहेब वाघमारे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Bicycle lamps parked in front of the shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.