संत महंतांचे आशीर्वाद घेऊनच आम्ही रणसंग्रामात उतरणार- अशोकराव चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:38 AM2019-02-08T00:38:10+5:302019-02-08T00:38:41+5:30
संत महंताचे आशीर्वाद घेऊनच आम्ही आगामी निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरणार असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : संत महंताचे आशीर्वाद घेऊनच आम्ही आगामी निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरणार असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.
परतूर येथे माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांच्यातर्फे रामकथा व कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कथेचा गुरुवारी समारोप करण्यात आला. यावेळी बोलतांना चव्हाण म्हणाले की, आज रामक थेचा समारोप व माजी आ. सुरेश जेथलिया यांचा वाढदिवस हा दुग्धशर्करा योग आहे. आमचे स्व. पिता शंकरराव चव्हाण यांचे व संतांचे नात जिव्हाळ्याचे होते. आम्ही ते टिकवल. आगामी काळात ते अधिक दृढ होईल. संत महंतांनी दाखवलेला आमचा मार्ग आमचा राजमार्ग व्हावा. राजकारणात चढउतार येतच असतात. तसेच विदर्भ आणि मराठवाडा वेगळा नाही, मराठवाडा ही संताची भूमी आहे, तर विदर्भालाही संतांच्या विचाराची जोड असून, आम्ही संतांच्या आशिर्वादाची शिदोरी घेवूनच पुढे जाणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी अंजली जेथलिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी खा. एकनाथ गायकवाड, माजी आ. कैलास गोरंट्याल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, मंजुषा देशमुख, राजेंद्र राख, सभापती कपील आकात, अॅड. अन्वर देशमुख, विजय राखे, रमेश सोळंके, नितीन जेथलिया यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आगामी आमदार सुरेश जेथलिया- खा. चव्हाण
यावेळी खा. अशोक चव्हाण म्हणाले की, आगामी आमदार सुरेश जेथलिया हे राहणार आहेत. त्यांच्या मागे उभे राहा. शेवटी तुमच्याच हातात आहे. जनतेचे आशीर्वाद व पे्रम त्यांच्या सोबत आहे, असेही खा. चव्हाण म्हणाले.
लोकसंग सोडला नाही- जेथलिया
सुरेशकुमार जेथलिया म्हणाले की, मी राजकारणी आहे, मात्र धार्मिकता आणि लोकसंग सोडला नाही. आपला विश्वास व पे्रम असेच कायम ठेवा. तो सार्थ करून दाखवू अशीही ग्वाही याप्रसंगी दिली.