लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सर्वच विद्यार्थ्यांमध्ये चांगले शिक्षण घेण्याची क्षमता असते. विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमता ओळखून त्याला ज्ञानदान करणे गरजेचे आहे. यासाठी मंठा व बदनापूर तालुक्यातील ५० हून अधिक शिक्षकांना मेंदू विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात आले आहे. दोन्ही तालुक्यात्ांील जवळपास १२ शिक्षकांनी प्रायोगिक तत्त्वावर हा कार्यक्रम आपल्या शाळेत राबविण्यास सुरूवात केली आहे.शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कमी- अधिक प्रमाणात लाभ होत आहे. आता विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासाला चालना देण्यासाठी मेंदू विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमता तपासण्यासाठी विद्यार्थ्यांचा आयक्यू पाहून निर्णय घेतले जात होते. मात्र, नांदेड येथील डायटमधील साधन व्यक्ती प्रा. बाळासाहेब कच्छवे यांनी अभ्यास केलेल्या मेंदू विकास कार्यक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. आयक्यूच्या पुढे जाऊन ईक्यू ही संकल्पना कच्छवे यांनी मांडली आहे.कच्छवे यांच्या उपस्थितीत नुकताच परतूर- मंठा तालुक्यातील शिक्षकांसाठी दहिफळ भोंगाने शाळेत मेंदू विकास कार्यशाळा घेण्यात आली.परिणामांची पाहणी करणारकाही शिक्षकांनी पुढाकार घेऊन मेंदू विकास कार्यक्रम आपापल्या शाळेत सुरू केला आहे. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासाला मिळणारी चालना, त्याच्या परिणामांची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर या कार्यक्रमाचा इतर शाळांबाबत विचार केला जाणार आहे. - राजेंद्र कांबळे, प्राचार्य डाएट
शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविला जातोय मेंदू विकास कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:36 AM