परतूर : तालुक्यातील माव पाटोदा येथील शेतकरी अमोल भगवान आकात यांचे गावच्या शिवारात शेत आहे. आकात यांच्या शेतातील पाच एकर उसाला ११ मार्च रोजी शॉर्टसर्किटने अचानक आग लागली. या आगीत पाच एकरावरील ऊस जळून खाक झाला. या घटनेचा महावितरणने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आकात यांनी केली आहे.
पन्नास वाचनालयांना पुस्तके भेट
परतूर : आमदार राजेश राऊत यांच्या स्थानिक विकास निधीतून तालुक्यातील ५० वाचनालयांना प्रत्येकी ३० हजार रुपये किमतीची पुस्तके भेट देण्यात आली आहेत. या पुस्तकांचे वितरण नगर पालिकेच्या सार्वजनिक वाचनालयात करण्यात आले. यावेळी ग्रंथपाल हाफीज अन्सारी, मुकुंद खंदारे, संजय शिंदे, संतोष आखाडे, पहाडे, राकेश शहा यांच्यासह वाचकांची उपस्थिती होती.
परतूर तालुक्यात गहू काढणीला वेग
परतूर : तालुक्यात गहू, ज्वारी व हरभऱ्यासह इतर पिकांची काढणी सुरू आहे; मात्र अवकाळी पावसाच्या अंदाजाने शेतकरी धास्तावले आहेत. यावर्षी पाणीपातळी चांगली असल्याने गहू, हरभरा, ज्वारी आदी पिके चांगली आली आहेत. परंतु, सतत ढगाळ वातावरण निर्माण होत असून, अवकाळी पावसाच्या अंदाजाने शेतकरी धास्तावले आहेत. मजुरांची अडचण व अवकाळी पावसाची शक्यता, यामुळे शेतकरी पिके काढणीची घाई करत आहेत. गव्हासाठी हार्वेस्टर व हरभरा, ज्वारीसाठी मळणी यंत्रांची मागणी वाढली आहे.
===Photopath===
130321\13jan_3_13032021_15.jpg~130321\13jan_4_13032021_15.jpg
===Caption===
उस खाक~गहू पीक