लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समिती २ कोटी ८६ लक्ष रुपये स्वनिधीतून साकारत असलेल्या ३४ गाळ्यांच्या व्यापारी संकुलामुळे शहरातील बाजारपेठ वाढीसाठी मदत होणार आहे. त्याचा शेतकऱ्यांनाही फायदा होईल, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.शहरातील म्हाडा रोडवरील गाळे बांधकामाचा रविवारी भूमिपूजन समारंभ झाला. या प्रसंगी खा. दानवे बोलत होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून वंदन करण्यात आले. खा. दानवे म्हणाले, नवीन व्यापारी संकुलामुळे बाजार समितीच्या आवारात व्यापारी व व्यवसायिकांची संख्या वाढून शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्यासाठी स्थानिक व्यापा-यांमध्ये स्पर्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतक-यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळून शेतक-याच्या पदरात जास्तीचे चार पैसे पडणार आहेत. त्यामुळे नवीन व्यापारी संकूल हे शेतकरी व व्यापा-यांच्या उन्नती व विकासासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास खा. दानवे यांनी व्यक्त केला.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख, रामेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन विजयसिंह परिहार, विनोद गावंडे, जि. प. सदस्या आशा पांडे, मुकेश चिने, सुखलाल बोडखे, जाफराबाद बाजार सिमतीचे सभापती भाऊसाहेब जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेश चव्हाण, बाजार समितीचे सभापती कौतीकराव जगताप, उपसभापती रामलाल चव्हाण, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गणेश ठाले, जि. प. सदस्य संतोष लोखंडे, जि. प. सदस्य विठ्ठल चिंचपुरे, दीपक जाधव, भाजपा शहराध्यक्ष सतिश रोकडे, सुधीर पाटील, दीपक वाकडे, भगवान खाकरे, विजय कड आदींची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमास बाजार समितीचे सचिव दादाराव दळवी, संचालक अॅड. विश्वास सपकाळ, बालाजी औटी, समाधान शेरकर, इम्रानखा पठाण, विश्वनाथ जाधव, सांडू वाघ, गुलाबराव मगरे, प्रल्हाद शिंदे, गणेश देशमुख, बाबुप्रसाद शर्मा, सुरेश तळेकर, पुरूषोत्तम राठी, कैलास पुंगळे, सुभाष गावंडे, विजय इंगळे, कल्याण शेळके यांच्यासह लेखापाल संतोष ढाले, सहायक सचिव हरीभाऊ जंजाळ, अनिल रोकडे, भाऊराव तळेकर, योगेष बिरसोने, हरी पवार, रामकृष्ण गाढे आदी उपस्थित होते.
भोकरदन येथील व्यापारी संकुलामुळे बाजारपेठेस मोठी चालना मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 1:05 AM