लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अनुसूचित जमातीच्या बनावट प्रमाणपत्राधारे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणाऱ्यांचा चंदनझिरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तिघाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नागेवाडी येथील रहिवासी अंकुश वेताळ याने गावातील अनिल तिरुखे आणि अन्य तिघा जणांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद चंदनझिरा पोलिसात दिली होती. यावरुन चौघाजणांविरुध्द मारहाण करून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जातीचा पुरावा म्हणून फिर्यादीने आईचे जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. त्यामुळे त्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शीलवंत ढवळे यांच्याकडे होता. गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर सदर गुन्ह्यातील तपास सुरू असताना १३ मार्च २०१५ रोजी गुरन ५/१५ कलम ३२६, ३२४, ३२३, ५०६, ३४ भा. द .वि नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी न्यायालयामध्ये भिल्ल जातीचा पुरावा म्हणून आपल्या आईचे नावाचे प्रमाणपत्र दिले होते. व स्वत:चे प्रमाणपत्र काढले नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते, व स्वत:चे जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी वेळ मागितला होता, सदर गुन्ह्याचा तपास हा त्यावेळेचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी दीक्षितकुमार गेडाम यांच्याकडे होता, या बाबीची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे जातीच्या प्रमाणपत्राची मागणी करता ते मिळाले नसल्याचे सांगून परत पुरावा म्हणून आपल्या आईचे जात प्रमाणपत्र दिले होते.२०१५ पासून अंकुश वेताळ याने आपले जातीचे प्रमाणपत्र काढले नसल्याने त्याच्याविरुध्द पोलिसांचा संशय बळावला. त्याची गुप्त माहिती काढली असता तो आदिवासी समाजाचा नसल्याची खात्री झाली.अंकुश वेताळ याने जातीचा कागदपत्राचा खुलासा सादर करू न शकल्याने त्याच्या विरुद्ध उपविभागीय पोलीस अधिकारी शीलवंत ढवळे यांच्या आदेशाने चंदनझिरा पोलीस ठाण्यात सरकारतर्फे श्निवारी २३ फेबु्रवारी रोजी प्रमोद बोडले यांच्या फिर्यादीवरुन अंकुश वेताळ, त्याला मदत करणारी त्याची आई, कार्तिक वाकळे यांच्या विरुध्द फसवणूक केल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुनील इंगळे तपास करत आहेत.
खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या तिघांचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:49 AM