सीए तसेच कर सल्लागारांच्या या आंदोलनास व्यापारी महासंघानेही पाठिंबा दिला होता. त्यांनी देखील रेल्वेस्थानक परिसरातील जीएसटीच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी व्यापारी महासंघाचे प्रभारी अध्यक्ष विनीत साहनी, सतीश पंच, संजय दाड, श्याम लोया, विजय राठी, इंद्रचंद्र तवरावाला, दिलीप शहा, बंकट खंडेलवाल, विनोद कुमावत, विजय सुराणा, उत्त प्रसाद लड्डा, संजय रूईखेडकर, ग्रामीण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष हस्तीमल बंब दीपक भुरेवाल या व्यापारी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
सीए उतरले रस्त्यावर
जीएसटी कायद्यातील बदलामुळे व्यापारी तसेच उद्योजक हैराण आहेत. त्याचप्रमाणे व्यापारी अन् सरकार यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेले सीए, देखील जीएसटीच्या बदलांमुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या कायद्यास आमचा विरोध नाही, परंतु वारंवार होत असलेले बदल किचकट स्वरूपाचे आहेत. त्यामुळे जवळपास प्रथमच सीए आणि कर सल्लागार आंदोलनात सहभागी झाले होते. त्यात चार्टर्ड अकाऊंटस संघटनेचे अध्यक्ष दर्शन जैन, उपाध्यक्ष नटवर मर्दा, सचिव गौरव गिदोंडीया, शुभम मुंदडा, सागर कवना, निखिल बाहेती, पंकज गिल्डा, निलेश श्रोऋीय , अतिश काबरा, गोविंद गिल्डा, अतुल मंत्री, चैतन्य बावकर, सौरभ गर्ग