८० पर्यवेक्षिकांना ‘कॅस’चे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:41 AM2019-05-13T00:41:39+5:302019-05-13T00:42:08+5:30
अंगणवाडी सेविकांना मोबाईल देऊन त्यांच्या कामाशी संबधित सर्व नोंदी अॅपद्वारे घेण्याच्या प्रक्रियेला जूनपासून सुरूवात होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने ‘कॉमन अप्लीकेशन सॉप्टवेअर’ या विषयी पर्यवेक्षिकांना ८ ते ११ मे दरम्यान प्रशिक्षण देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अंगणवाडी सेविकांना मोबाईल देऊन त्यांच्या कामाशी संबधित सर्व नोंदी अॅपद्वारे घेण्याच्या प्रक्रियेला जूनपासून सुरूवात होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने ‘कॉमन अप्लीकेशन सॉप्टवेअर’ या विषयी पर्यवेक्षिकांना ८ ते ११ मे दरम्यान प्रशिक्षण देण्यात आले. ८० पर्यवेक्षिका व १४ ब्लॉक कॉडिनेटरांनी हे प्रशिक्षण घेतले असून, १ हजार ५४६ कार्यकर्तींना मोबाईलचे वितरण करण्यात आले आहे.
शनिवारी या प्रक्षिणाचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी विभागीय आयुक्त कार्यालयाचे पोषण महा अभियानाचे समन्वयक एस. एल.
हरदास, जागतिक बँकेचे प्रतिनिधी रमेश बाबू, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी खरात, जिल्हा समन्वयक भारती निर्मल यांची उपस्थिती होती.
अंगणवाडीतील बालकांच्या दैनंदिन नोंदी, लसीकरण, गृहभेटी, स्तनदा माता, गरोदर माता व किशोरवयीन मुलींच्या आरोग्य विषयक नोंदी, पोषण आहाराचे वाटप आदी कामे अंगणवाडी सेविका करतात. या कामांच्या नोंदी विविध ११ रजिस्टरमध्ये कराव्या लागतात. त्यामुळे अनेकदा नोंद करण्यास उशीर होतो.
जिल्हास्तरावरील कार्यालयाला अहवालही वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे ग्रामविकास विभागाने अंगणवाडी सेविकांना मोबाईल देऊन, अँपद्वारे नोंदी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १५४६ अंगणवाड्यांना मोबाइल मिळणार आहे. याबाबत बुधवारपासून
प्रशिक्षणास घेण्यात येत होते. जिल्हास्तरावर ८० पर्यवेक्षिका व निवडक कार्यकर्तींना हे प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हास्तरावरील
प्रशिक्षणानंतर तालुकानिहाय अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दरम्यान, कॅस प्रोग्रम हा ग्राम पातळीवर चांगल्या प्रकारे राबवाव. तसेच अंगणवाडी सेविकांनी व्यवस्थित नोंदी घेऊन कामाचे नियोजन करावे, असे हरदास यांनी सांगितले.