संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कआज वेगवेगळ्या कारणांमुळे असाध्य असा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. हा आजार जडल्यानंतर प्रत्येकजण हवालदिल होतो. आता आपल्या आयुष्यात काही रस नाही, असे समजून तो निराशेच्या गर्तेत जातो. परंतु, अॅलोपॅथी सोबतच आयुर्वेदातही कर्करोगावर अनेक खात्रीशीर उपाय सांगितले आहेत. अॅलोपॅथी आणि आयुर्वेदाची सांगड घालून या दुर्धर आजारावर मात करणे शक्य असल्याचा विश्वास आयुर्वेद फेलोशिपमध्ये देशातून प्रथम आलेले डॉ. अभिषेक शुक्ला यांनी व्यक्त केला.आयुर्वेद आणि कॅन्सरचा कसा संबंध?आज जरी कर्करोग हा आपल्याला अॅलोपॅथीच्या माध्यमातून अलीकडे कळत आहे. परंतु, अंदाजे पाच हजार वर्षांपूर्वी वैद्यराज सुश्रूत यांनी मानवाला ‘अबूर्द’ हा आजार म्हणजेच कर्करोग म्हणून संबोधले होते. ही व्याधी असाध्य म्हणून त्याच वेळी सांगितले होते. परंतु, व्याधी असाध्य असली तरी आयुर्वेदात त्या काळातही यावर अनेक खात्रीशीर उपाय होते.इंटिग्रेटेड अॅप्रोच महत्त्वाचा?कर्करोगावर ज्या प्रमाणे आज रेडिएशन, केमो थेरपी, शस्त्रक्रिया हे तीन उपाय प्रभावी आहेत. त्याचप्रमाणे आयुर्वेदातही शल्य, क्षार आणि अग्नीकर्म असे उपाय सांगितले आहेत. त्यामुळे आयुर्वेद आणि आधुनिक औषधशास्त्राची सांगड घालून या आजारावर मात करणे शक्य आहे. त्यामुळे हा आजार झालेल्या रूग्णांनी खचून जाऊ नये. आता या आजारावर अत्याधुनिक औषधींसह आयुर्वेदिक औषधीही प्रभावी ठरत आहेत.आयुर्वेदात काम करणारी आमची ही तिसरी पिढी आहे. वडील, चुलते आणि मी तसेच बहीण याच क्षेत्रात रूग्णसेवा करीत आहोत. रूग्णांना सेवा देताना त्यांच्याकडे आर्थिक क्षमता नसलेली तरी देखील आम्ही सेवाधर्म या माध्यमातून त्यांना शक्य ती मदत करत आहोत. भविष्यातही ही परंपरा जपण्याचे प्रयत्न करू, असे ते म्हणाले.तज्ज्ञांचे मार्गदर्शनकर्नाटक मधील बेळगाव येथील के.एल.ई. विद्यापीठाने कर्करोगावर आयुर्वेदात संशोधन करण्यासाठी फेलोशिप सुरू केली होती. यामध्ये प्रॅक्टीकल, थेअरी तसेच अॅलोपॅथी तज्ज्ञ आणि आयुर्वेदातील तज्ज्ञ यांच्याकडे जाऊन इंटीग्रेटेड अभ्यास सुरू केला होता. त्यात आपण देशातून फेलोशिपमध्ये अव्वल आलो आहोत.
‘कॅन्सर इज डेथ सेंटेंस्’ संकल्पना बदलायचीय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:38 AM