मृत जलसाठ्यावर नागरिकांची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:41 AM2019-03-10T00:41:22+5:302019-03-10T00:41:40+5:30

भोकरदन अर्ध्या तालुक्याची व विदर्भातील काही ग्रामस्थांची तहान भागविण्याऱ्या पद्मावती धरणात केवळ दीड महिना पुरेल, एवढाच जलसाठा शिल्लक राहिला आहे.

Citizens depending on the dead water storage | मृत जलसाठ्यावर नागरिकांची मदार

मृत जलसाठ्यावर नागरिकांची मदार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वालसावंगी : भोकरदन अर्ध्या तालुक्याची व विदर्भातील काही ग्रामस्थांची तहान भागविण्याऱ्या पद्मावती धरणात केवळ दीड महिना पुरेल, एवढाच जलसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
उत्तर भोकरदन परिसरातील सर्व लहान- मोठी धरणे सध्या आटली आहेत. केवळ पद्मावती धरणातच मृतजलसाठा शिल्लक राहिला आहे.
दुष्काळामुळे सध्या सर्वत्र पाणी टंचाईचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहे. सर्व जलस्त्रोत आटले असल्याने टँकरवर नागरिकांची तहान भागविण्यासाठी पद्मावती धरणाच्या परिसरात विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.
यावरून दररोज ५० टँकरद्वारे भोकरदन तालुक्यातील धावडा, सुंदरवाडी, पिंपळगाव रेणुकाई, जळगाव सपकाळ, अवघडराव सावंगी, आन्वा, वालसावंगी आदी व बुलडाणा जिल्ह्यातील धामणगाव, तराडखेड, कुम्मणी, देवूळघाट यासह अनेक गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु, धरणातील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत चालली आहे. यामुळे धरणात केवळ दीड महिना टिकेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.
याबाबत सरपंच रंजना आहेर म्हणाल्या, सद्य स्थितीत गावातील नागरिकांना वेळेवर पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु, येणाऱ्या काळ कठीण जाण्याची शक्यता असून, पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती होऊ नये, यासाठी उपाय- योजना करणे सुरू आहे. तसेच परिसरात रस्त्यांची मोठ्या प्रमणात कामे सुरू आहेत. यामुळे रस्त्यावर पाणी मारण्यासाठी देखील येथूनच टँकर भरून नेले जात आहेत.
१० विहिरी अधिग्रहण, सात टँकर सुरू
परतूर : तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई तीव्र होऊ लागली असून, आता पर्यंत १९ विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत, तर ७ टँकर सुरू करण्यात आले आहेत.
तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेबरोबरच पाणी टंचाईचे चित्र गडद होऊ लागले आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने विहिरी, बोअर, तलाव कोरडे पडत आहेत. एप्रिल मध्ये होणारी पाणी टंचाई यावर्षी फेब्रुवारी च्या सुरुवातीपासूनच जाणवू लागली आहे. विहीर अधिग्रहण व टँकरसाठी प्रस्ताव येऊ लागले आहेत. काही गावाला तर टँकरसाठी उपोषणही करावे लागत आहे.
सुरूमगावला उपोषणा नंतरच टँकर सुरू करण्यात आले. सद्या तालुक्यात ७ गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. टँकरसाठी ११ प्रस्ताव आले आहेत. यापैकी लिखित पिंप्री, परतवाडी, ढोकमाळ तांडा, कºहाळा, खांडवी वाडी, सुरूमगाव या सहा गावांना टँकर सुरू आहे. तर शेवगा या गावाला वर्षभर टँकरने पाणी सुरू आहे. या गावातील पाणी घातक क्षार युक्त असल्याने ते पिण्यास योग्य नाही. तर विहीर अधिग्रहणासाठी एकूण २६ प्रस्ताव आले आहेत.
यापैकी १९ प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

Web Title: Citizens depending on the dead water storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.