विदर्भातील नागरिकांनी रोखले वॉटरग्रीडचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:18 AM2019-01-25T00:18:48+5:302019-01-25T00:19:15+5:30

आमच्या हक्काचे पाणी मराठवाड्यात नेऊ देणार नाही, अशी भूमिका घेत देऊळगाव राजा येथील खडकपूर्णा परिसरात सुरु असलेल्या वॉटरग्रीड योजनेच्या विहिरीचे काम पाणी बचाव समितीने रोखल्याने या योजनेला ग्रहण लागले आहे.

Citizens of Vidarbha stopped work of Watergird | विदर्भातील नागरिकांनी रोखले वॉटरग्रीडचे काम

विदर्भातील नागरिकांनी रोखले वॉटरग्रीडचे काम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
तळणी : आमच्या हक्काचे पाणी मराठवाड्यात नेऊ देणार नाही, अशी भूमिका घेत देऊळगाव राजा येथील खडकपूर्णा परिसरात सुरु असलेल्या वॉटरग्रीड योजनेच्या विहिरीचे काम पाणी बचाव समितीने रोखल्याने या योजनेला ग्रहण लागले आहे. पाण्यावरुन मराठवाडा-विदर्भाच्या प्रादेशिक वादाला सुरवात झाली आहे.
पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी नुकतेच जालना, परतूर, मंठा तालुक्यातील ९२ गावांचा वॉटरग्रीड योजनेच्या जलकुंभाचे नेर- सेवली आणि तळणी येथे भूमिपूजन केले. ही योजना दोन वर्षात पूर्ण होणार असून ९२ गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचा दावा लोणीकरांनी केला होता. मात्र, विदर्भातील देऊळगावराजा, देऊळगाव मही आणि अन्य गावांतील ग्रामस्थांनी येथील खडकपूर्णा प्रकल्पात सुरु असलेल्या विहीरीचे काम संतप्त नागरिकांनी रोखले. यामुळे योजनेच्या सुरुवातीलाच ग्रहण लागले आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये वॉटरग्रीडचे काम अंतिम पातळीवर आले असून, त्याचा आराखडा देखील तयार आहे, सध्या केवळ पिण्याच्या पाण्याचाच यात विचार होणार असल्याचे सांगण्यात आले.
योजनेचे काम होणारच - बबनराव लोणीकर
वॉटरग्रीड योजनेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, या योजनेचे काम वेळेत पूर्ण होणार असल्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
२८ जानेवारीला मोर्चा
खडकपूर्णा प्रकल्पात सुरु असलेल्या विहिरींचे कामही रोखले असून २६ जानेवारीला सर्व ग्रा.पं मध्ये हे पाणी देण्याच्या विरोधात ठराव घेण्यात येणार आहे. यासाठी २८ जानेवारीला देऊळगावराजा येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राम खांडेभराड यांनी सांगितले.

Web Title: Citizens of Vidarbha stopped work of Watergird

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.