जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी संविधान दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 11:49 PM2018-11-26T23:49:30+5:302018-11-26T23:49:55+5:30
शहरात सोमवारी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरात सोमवारी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. शहरातील शाळा, महाविद्यालय व शासकीय कार्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
कन्हैयानगर
जालना : येथील कन्हैयानगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी भारिपचे नेते शिवाजी दाभाडे, भारिप सचिव विनोद दांडगे, सिद्धार्थ अंभोरे, समाधान कांबळे, सुमित गायकवाड, हेमंत जाधव, प्रदीप कुमकर, पप्पू दाभाडे, घुले, विकास यंगड, किरण शिंदे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पार्थ सैनिकी शाळा
जालना : येथील पार्थ सैनिकी शाळेमध्ये संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास मुख्याध्यापक डी. टी. जगरवाल यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी एस. डी. काकडे, भगवान पडूळ, लक्ष्मण गिरे, ऋषिकेश वाघुंडे, कश्यपकुमार वाहूळकर, शरद अक्कलकर, श्याम शिंदे, सुरेश राठोड, ज्ञानेश्वर कळसे, राजेश नरवाडे, शिवहरी खंड्रे, अरविंद सुरवासे, ओमप्रकाश गाढवे आदींची उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडक विद्यालय
जालना : येथील डॉ. बाबासाहेब आंबडेकर विद्यालयात आयोजित कार्यक्रमास धम्मदीप संघाचे सचिव कुसुमाकर पंडित, भगवान बोरुडे, मुख्याध्यापक व्ही. आर. सरवदे, विजय कुलकर्णी, एस. एस. खरात यांची उपस्थिती होती.
बारवाले महाविद्यालय
जालना : येथील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमास प्राचार्य डॉ. कविता प्राशर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाधिकारी डॉ. भगवानसिंग डोभाळ, डॉ. व्यंकटेश कोरेवोईनवाड, डॉ. सुनीता भराडे, डॉ. कालिदास सूर्यवंशी, प्रा. संभाजी कांबळे, प्रा. विलास भुतेकर, डॉ. बी. डी. कटारे, डॉ. रवींद्र भोरे, डॉ. क्षमा अनभुले, डॉ. सांगवीकर, डॉ. निशिकांत लोखंडे, कार्यालयीन अधीक्षक मिलिंद कुलकर्णी, अजय जोशी, विजय लोणकर, राम हिवरेकर आदींची उपस्थिती होती.
स्काऊटस आणि गाईड्स
जालना : येथील भारत स्काऊट्स आणि गाईड्स संस्थेत आयोजित कार्यक्रमास मुख्याध्यापक इंद्रजित जाधव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा सचिव पवन जोशी, प्रिया अधाने, संदीप घुसिंगे, रमेश वारे, हरिचंद्र जारवाल, नंदू आडे यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी कार्यालय
जालना : जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर, तहसीलदार संतोष बनकर यांच्यासह उपस्थितीत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करुन शपथ घेतली.
यावेळी खटावकर, पेरे, आर. आर. महाजन, संपदा कुलकर्णी तसेच प्रशासकीय इमारतीचे अधिकारी, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
जिजामाता प्राथमिक शाळा
जालना : येथील जिजामाता प्राथमिक शाळेत आयोजित अभिवादन कार्यक्रमास मुख्याध्यापक के. यु. शेवाळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी ए. बी. राठोड, एम. जे. कांगडे, जी. आर. काळे, एस. जी. कोकटे, एस. डी. बोडखे, व्हि. एस. शेळके आदींची उपस्थिती होती.
नूतन वसाहत, सेलगाव
जालना : सेलगाव येथील नूतन वसाहत येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संजय हेरकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी गौतम सोनवणे, अनिल वाहुळे, आशिफ शेख, अमोल तुपे, बबलू शेख, सुरेश नवले, कृष्णा सोनवणे, रामदास बोर्डे, प्रकाश सोनवणे, अक्षय वाहुळे आदी उपस्थित होते.
जि.प. शाळा, सेलगाव
जालना : येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी सुर्यकांत कडेलवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राणा ठाकूर, संजय हेरकर, नवनाथ पालोदकर, गौतम सोनवणे, अनिल वाहुळे, इसरत अन्सारी, कृष्णा लष्करे, अमोल तुपे, बबलू शेख, विलास सोनवणे, सुरेश नवले आदींची उपस्थिती होती.
उर्दू हायस्कूल
जालना : येथील उर्दु हायस्कूलमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थी व शिक्षकांनी भारतीय संविधानाबाबत माहिती दिली. मुख्याध्यापक मो. इफ्तीकारउद्दीन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. भारतीय संविधान हे जगातील श्रेष्ठ संविधान असल्याचे ते म्हणाले. यावेळी शेख नबील, निसार देशमुख, शेख अनिस, शे. सिकंदर, वहिदा यास्मीन, फरहत जाहान आदींची उपस्थिती होती.