उत्सवादरम्यान शांतता अबाधित राखण्यासाठी सहकार्य करा- चैतन्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:46 AM2018-09-12T00:46:30+5:302018-09-12T00:47:28+5:30
सण उत्सवाच्या काळात सामाजिक सौहार्द टिकवून ठेवत शांतता व सुव्यवस्था राखण्याची जिल्ह्याची परंपरा असून ही परंपरा कायम ठेवत गणेशोत्सव व मोहर्रम सण शांततेत साजरे करावेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सण उत्सवाच्या काळात सामाजिक सौहार्द टिकवून ठेवत शांतता व सुव्यवस्था राखण्याची जिल्ह्याची परंपरा असून ही परंपरा कायम ठेवत गणेशोत्सव व मोहर्रम सण शांततेत साजरे करावेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले.
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना चैतन्य बोलत होते.
व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, गणेश महासंघाचे अध्यक्ष रवी अग्रवाल, राजेंद्र आबड, इक्बाल पाशा, आयेशा खान, पारसनंद यादव आदींची उपस्थिती होती.