जालन्यात कोराेनाचा स्फोट : चौघांचा मृत्यू, १७१ जणांना बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:42 AM2021-02-27T04:42:18+5:302021-02-27T04:42:18+5:30

जालना जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून, या लाटेने कहर केल्याचे दिसून येत आहे. एकट्या जालना शहरात १०२ जणांना ...

Corana blast in Jalna: Four killed, 171 injured | जालन्यात कोराेनाचा स्फोट : चौघांचा मृत्यू, १७१ जणांना बाधा

जालन्यात कोराेनाचा स्फोट : चौघांचा मृत्यू, १७१ जणांना बाधा

Next

जालना जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून, या लाटेने कहर केल्याचे दिसून येत आहे. एकट्या जालना शहरात १०२ जणांना कोरोनाची लागण झाल्याने मोठी घबराट निर्माण झाली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी चौघांचा मृत्यू झाला असून, तालुका आणि गावनिहाय आकडेवारीदेखील थक्क करणारी असून, शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरण्यास प्रारंभ केला आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका बजावली आहे. त्यात पथकांची स्थापना केली असून, मास्क न लावणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे.

चौकट

जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती

जालना १०२, गाढे सावरगाव १, बठाण १, काळेगाव १, तांदूळवाडी १, वखारी वडगाव १, कारंजा १, वीरेगाव १, इंदेवाडी १, सावरगाव १, हिवर्डी १, मंठा तालुक्यात ३ जणांना लागण झाली असून, त्यात लावणी १, वाई २, परतूर ४, परतूर शहर २, वाटूरफाटा १, आष्टी १, घनसावंगी तालुक्यात पाच जणांना लागण झाली आहे. चित्तेवडगाव १, राजेगाव १, बेलवाडी १, कोठाळा १, वडगाव १, अंबड तालुक्यात ३ जणांना लागण झाली असून, अंबड शहर २, सोनकपिंपळगाव १, बदनापूर तालुका ३, देवगाव १, अकोला १, मांडवा १ असे तीन पॉझिटिव्ह आले आहेत. जाफराबाद तालुक्यात ७ जणांना लागण झाली असून, त्यात जाफराबाद शहर १, किन्ही २, हिवराकाबली २, काचनेरा १, हरतखेडा १ तर भोकरदन तालुक्यात २७ जणांना बाधा झाली आहे. भोकरदन शहर २, जयदेववाडी अर्थात जाळीचा देव २२, तोंडुळी १, तळेगाव २ जणांना लागण झाली असून, बुलडाणा जिल्ह्यातील ६, तर परभणी जिल्ह्यातील एक जण जालन्यात उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात कोरोनाने १५ हजारांचा टप्पा केला पार

जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत १५ हजार १४९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यातून बरे होणाऱ्यांची संख्यादेखील चांगली आहे. बरे होणाऱ्यांची संख्या १३ हजार ९३१ एवढी आहे. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ही ३९० वर पोहोचली आहे. सद्य:स्थितीत जालन्यात ८२८ जणांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: Corana blast in Jalna: Four killed, 171 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.