यासह जाफराबाद १, खासगाव १, नळविहरा १, सवासनी १, टेंभूर्णी १, भोकरदन शहर ७, आन्वा २, चिंचोली १, दानापूर २, जवखेडा ठेांबरे १, केदारखेडा १, नळणी १, पिंपळगाव १, राजूर १, तपोवन ३ अन्य जिल्ह्यातील रूग्णांमध्ये बुलडाणा २६ आणि वाशिम एक असे एकूणच चारेश रूग्ण आढळले आहेत.
चौकट
जिल्हा रूग्णालयाची ओपीडी हलवली
मध्यंतरी जालना जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली होती. त्याामुळे आधी जिल्हा सामान्य रूग्णालयाची ओपीडी अर्थात बाह्यरूग्ण विभाग हा जालन्यातीलच गांधी चमन येथील महिला व बाल रूग्णालयात हलविला होता. परंतु तो पुन्हा जिल्हा रूग्णालयात आणण्यात आला होता. आता रूग्णसंख्या वाढल्याने जिल्हा रूग्णालयात कोविड हॉस्पिटलसह अन्य इमारत संपूर्ण कोविडच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी राखून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ही ओपीडी शुक्रवारी महिला रूग्णालयात हलविण्याचा निर्णय तातडीने घेतला आहे.