भोकरदन : शहरात अवैध दारूविक्री करणा-या तीन ठिकाणी धाडी टाकून भोकरदन पोलिसांनी ४७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली.
शहरातील विविध भागांमध्ये छुप्या मार्गाने अवैध दारूविक्री सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये यांना मिळाली. या माहितीवरून सदर तीन ठिकांणी धाडी टाकल्या. जालना रोडवर सुरू असलेल्या दोन ठिकाणी धाडी टाकून ५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. शिवाजी बर्डे, कैलास फुके (रा. जोमाळा) यांच्यासह माल पुरविणारा सतीश ढवळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. भायडी शिवारात धाड टाकून एका पत्र्याच्या शेडमधून ४२ हजार रूपयांच्या देशी दारूच्या ७६८ बॉटल जप्त करण्यात आल्या. आरोपी नितीन एकनाथ दसपुते याला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये, पोलीस नाईक रामेश्वर सिनकर, पोलीस कर्मचारी जगदीश बावणे, गणेश पायघन, सागर देवकर, निलेश फुसे, एकनाथ वाघ, चालक लक्ष्मण वाघ यांनी केली.