- विजय मुंडेजालना : कोरोना विषाणूची साखळी मोडून काढण्यासाठी सर्वच पोलीस अधिकारी, कर्मचारी अहोरात्र गस्त घालत आहेत. या अधिकारी, कर्मचा-यांसह ठाण्यात येणाऱ्या नागरिकांचे निर्जंतुकीकरण करणारी यंत्रणा जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या प्रवेशद्वारावर बसविली जाणार आहे. पोलीस मुख्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयातही ही यंत्रणा बसविली जाणार आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाली आणि पोलीस अधिकारी, कर्मचा-यांवरील बंदोबस्ताचा ताण अचानक वाढला. कोरोनाची साखळी मोडून काढण्यासाठी नागरिकांनी घरात थांबावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, सीमा बंदीचे कोणी उल्लंघन करू नये, चोऱ्य्या होऊ नयेत यासह कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, म्हणून पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्यासह सर्वच उपविभागीय पोलीस अधिकारी, जवळपास १०० अधिकारी आणि १८०० कर्मचारी, ५०० होमगार्ड अहोरात्र गस्त घालत आहेत. जुना जालना शहरातील दु:खीनगर भागातील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणेवरील ताण अधिकच वाढला आहे.
कोरोना विषाणूची साखळी मोडून काढताना पोलीस अधिकारी, कर्मचा-यांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी पोलीस मुख्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय, सर्वच पोलीस ठाणे, वाहतूक शाखेच्या कार्यालयासह जवळपास २५ ठिकाणी निर्जंतुकीकरण यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय अधिका-यांच्या सूचनेनुसार सॅनिटायझर वापरले जाणार असून, पोलीस ठाणे, मुख्यालयात प्रवेश करणा-या अधिकारी, कर्मचा-यांचे निर्जंतुकीकरण करूनच त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. येथे कामानिमित्त येणा-या संबंधित नागरिकांचेही निर्जंतुकीकरण होणार आहे. प्रारंभी ही यंत्रणा शहरातील चारही ठाण्यात बसविली जाणार असून, ही यंत्रणा सर्वच ठाणे, संबंधित कार्यालयात कार्यान्वित होणार आहे. बंदोबस्तावरून घरी गेल्यानंतरही अधिकारी, कर्मचा-यांनी वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकूणच पोलीस अधिकारी, कर्मचाºयांच्या आरोग्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.
५००० हॅण्डग्लोज मिळणार, संस्था, संघटनांचीही मदतकोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालयात पोलीस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. शिवाय कोरोना बाधित क्षेत्रातही अधिकारी, कर्मचारी कार्यान्वित आहेत. या संबंधितांच्या सुरक्षेसाठी ४०० पीपीई किटची मागणी करण्यात आली आहे. वरिष्ठस्तरावरून ७२०० मास्क मिळाले असून, संबंधितांना वाटप करणयात आले आहेत. तसेच सॅनिटायझरचेही वाटप करण्यात आले आहे. कर्मचा-यांच्या सुरक्षेसाठी वाढीव पाच हजार हॅण्डग्लोजची खरेदी केली जाणार आहे. शिवाय विविध संस्था, संघटनांचीही पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना मोठी मदत होत आहे.
४०० वर खाजगी वाहने जप्तसंचारबंदीमुळे खाजगी वाहने रस्त्यावर आणण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करून रस्त्यावर वाहने घेऊन येणाºयांची संख्या मोठी आहे. अशा चालकांवर कारवाई करून जवळपास ४०० वाहने आजवर जप्त करण्यात आले आहेत. संचारबंदी काळात यापुढेही वाहने जप्तीची कारवाई सुरूच राहणार आहे.
होम क्वारंटाइन व्यक्तीवर गुन्हाहोम क्वारंटाइन असताना घराबाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. मनाई आदेशाचे उल्लंघन करून रस्त्यावर फिरणाºया एका होम क्वारंटाइन रूग्णावर पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो व्यक्ती कोरोना बाधित असलेल्या पुणे परिसरातून आला होता.
एसआरपीएफची प्लॅटून कार्यरतजिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तावर तैनात आहेत. सोबत आता एसआरपीएफची एक प्लॅटून कार्यरत झाली असून, ५०० होमगार्डही जिल्ह्याच्या विविध ठाणे हद्दीत बंदोबस्ताचे काम करीत आहेत.
निर्जंतुकीकरण वाहनही कार्यरतकोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तावर असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी विशेष व्हॅन तयार करण्यात आली आहे. ही व्हॅन शहरातील विविध भागात फिरून सिनिटझरद्वारे पोलीस अधिकारी, कर्मचाºयांचे निर्जंतुकीकरण करीत आहे.
पोलिसांकडून धडक कारवाईकोरोना विषाणूची साखळी मोडून काढण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी अहोरात्र गस्त घालत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनीही घरात बसून प्रशासनाला सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यावर येणा-या नागरिकांवर आता धडक कारवाई केली जाईल.- एस. चैतन्य, पोलीस अधीक्षक, जालना