CoronaVirus : जालन्यात विनाकारण रस्त्यावर आलेल्या १०१ दुचाकी चालकांविरूध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 08:24 PM2020-04-08T20:24:17+5:302020-04-08T20:24:54+5:30
पोलिसांनी वाहने जप्त करून ताब्यात घेतली
जालना : कोरोनामुळे लागू असलेल्या संचारबंदीतील नियमांचे उल्लंघन करीत विनाकारण रस्त्यावर फिरणाºया तब्बल १०१ वाहन चालकांवर सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गत दोन दिवसांमध्ये करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपर्यंत २७३ कोरोना संशयितांचे स्वॅब घेण्यात आले असून, १५३ जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. मात्र, सोमवारी ६ एप्रिल रोजी जुना जालना भागातील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या अहवालानंतर प्रशासन अधिकच सतर्क झाले असून, विनाकारण रस्त्यावर फिरणाºयांविरूध्द आता धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. सदरबाजार पोलीस ठाण्याचे पोनि संजय देशमुख व त्यांच्या सहकाºयांनी मागील दोन दिवसात एक दोन नव्हे तब्बल १०१ वाहन चालकांवर कारवाई करून आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केल आहेत.
पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि संजय देशमुख, सपोनि शिवाजी नागवे, कर्मचारी गणेश सोळुंके, समाधान तेलंग्रे, दीपक घुगे, फुलचंद गव्हाणे, वसंत धस, रमेश फुसे, चालक बंटी ओहोळ यांनी केली.
कारवाईत सातत्य राहणार
कोरोनाची साखळी मोडून काढण्यासाठी प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत आहे. मात्र, काहीजण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. अशांविरूध्द पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून, विनाकारण रस्त्यावर वाहने घेऊन फिरणाºयांवर यापुढेही गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
- संजय देशमुख, पोनि सदरबाजार पोलीस ठाणे