अपघातप्रकरणी चालकाविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:27 AM2021-03-14T04:27:17+5:302021-03-14T04:27:17+5:30

जालना : तालुक्यातील विरेगाव- रांजणी मार्गावरील गणेश जाधव यांच्या शेताजवळ १२ मार्च रोजी रात्री भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला (क्र. ...

Crime against the driver in an accident | अपघातप्रकरणी चालकाविरुध्द गुन्हा

अपघातप्रकरणी चालकाविरुध्द गुन्हा

Next

जालना : तालुक्यातील विरेगाव- रांजणी मार्गावरील गणेश जाधव यांच्या शेताजवळ १२ मार्च रोजी रात्री भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला (क्र. एमएच २१- बीआर ३०१४) जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणात राजेश कारभारी काहुरे (रा. रांजणी ता.) घनसावंगी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकी चालकाविरुध्द मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ गोडबोले हे करीत आहेत.

जुन्या भांडणातून घराला लावली आग

जालना : अंबड तालुक्यातील वैतागवाडी येथील राजाराम शेटीबा शिंदे यांच्या घराला १३ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास विशाल गागेश शिंदे व इतर दोघांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून आग लावली. या आगीत घरातील धान्य, कपडे व इतर साहित्य असा एकूण दोन हजार रूपयांचा मुद्देमाल जळाल्याची तक्रार राजाराम शिंदे यांनी गोंदी पोलीस ठाण्यात दिली. शिंदे यांच्या तक्रारीवरून विशाल शिंदे व इतर दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार दिवटे हे करीत आहेत.

दोन ट्रकमधील डिझेलची चोरी

अंबड : तालुक्यातील वडिलसुरा येथील राजेश दादाराव भिसे यांनी १२ मार्च रोजी रात्री त्यांच्या दोन ट्रक (क्र. एमएच ०९- बीसी ९६६६ व क्र. एमएच १०-बीजी ०८७७) अंबड शहरातील महाराणा प्रताप चौकातील केदार राठी यांच्या कॉम्पलेक्ससमोर लावल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी या दोन्ही ट्रकमधील एक लाख ७५ हजार ३०६ रूपये किमतीचे १९८४ लीटर डिझेल चोरून नेले. या प्रकरणी राजेश भिसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार स्कॉट हे करीत आहेत.

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जालना: मंठा शहरातील जवाहर कॉलनी भागातील आसाराम भगवान काकडे हे ९ मार्च रोजी सायंकाळी दुचाकीवरून वाटूर येथून मंठ्याकडे येत होते. त्यांची दुचाकी केंधळी शिवारात आली असता भरधाव कारने (क्र.एमएच २३- एडी ४२४२) समोरून जोराची धडक दिली. या अपघातात आसाराम काकडे हे गंभीर जखमी झाले. जखमी काकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कार चालकाविरुध्द मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार सेना हे करीत आहेत.

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

जालना : अंबड तालुक्यातील नांदी येथील संतोष रंगनाथ चांदणे (३८) हे १८ फेब्रुवारी रोजी रात्री जालना- अंबड मार्गावरून पायी चालत जात होते. त्यावेळी भरधाव आलेल्या दुचाकीने (क्र.एमएच२१- बीएन ७३९०) जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या संतोष चांदणे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रंगनाथ आसाराम चांदणे (रा. नांदी ता. अंबड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुचाकी चालकाविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहकॉ चापलकर हे करीत आहेत.

Web Title: Crime against the driver in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.