जालना : तालुक्यातील विरेगाव-रांजणी मार्गावरील गणेश जाधव यांच्या शेताजवळ १२ मार्च रोजी रात्री भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला (क्र. एम.एच. २१- बी.आर. ३०१४) जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणात राजेश कारभारी काहुरे (रा. रांजणी, ता. घनसावंगी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकीचालकाविरुद्ध मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.हे.कॉ. गोडबोले हे करीत आहेत.
जुन्या भांडणातून घराला लावली आग
जालना : अंबड तालुक्यातील वैतागवाडी येथील राजाराम शेटीबा शिंदे यांच्या घराला १३ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास विशाल गागेश शिंदे व इतर दोघांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून आग लावली. या आगीत घरातील धान्य, कपडे व इतर साहित्य असा एकूण दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जळाल्याची तक्रार राजाराम शिंदे यांनी गोंदी पोलीस ठाण्यात दिली. शिंदे यांच्या तक्रारीवरून विशाल शिंदे व इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार दिवटे हे करीत आहेत.
दोन ट्रकमधील डिझेलची चोरी
अंबड : तालुक्यातील वडीलसुरा येथील राजेश दादाराव भिसे यांनी १२ मार्च रोजी रात्री त्यांचे दोन ट्रक (क्र. एम.एच.०९- बी.सी.९६६६ व क्र. एम.एच.१०-बी.जी.०८७७) अंबड शहरातील महाराणा प्रताप चौकातील केदार राठी यांच्या कॉम्प्लेक्ससमोर लावले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी या दोन्ही ट्रकमधील एक लाख ७५ हजार ३०६ रुपये किमतीचे १९८४ लीटर डिझेल चोरून नेले. या प्रकरणी राजेश भिसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार स्कॉट हे करीत आहेत.
कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
जालना : मंठा शहरातील जवाहर कॉलनी भागातील आसाराम भगवान काकडे हे ९ मार्च रोजी सायंकाळी दुचाकीवरून वाटूर येथून मंठ्याकडे येत होते. त्यांची दुचाकी केंधळी शिवारात आली असता भरधाव कारने (क्र.एम.एच.२३- ए.डी.४२४२) समोरून जोराची धडक दिली. या अपघातात आसाराम काकडे हे गंभीर जखमी झाले. जखमी काकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारचालकाविरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार सेना हे करीत आहेत.
दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
जालना : अंबड तालुक्यातील नांदी येथील संतोष रंगनाथ चांदणे (३८) हे १८ फेब्रुवारी रोजी रात्री जालना- अंबड मार्गावरून पायी जात होते. त्या वेळी भरधाव आलेल्या दुचाकीने (क्र.एम.एच.२१- बी.एन.७३९०) जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या संतोष चांदणे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रंगनाथ आसाराम चांदणे (रा. नांदी, ता. अंबड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुचाकीचालकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.हे.कॉ. चापलकर हे करीत आहेत.