अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याने पाच जणांविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 12:22 AM2019-05-06T00:22:27+5:302019-05-06T00:22:52+5:30
वय कमी असल्याने पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून गर्भपात करण्यास भाग पाडून इतर दोन जणांसोबत अनैतिक संबंध ठेवण्यास प्रोत्साहन दिल्याची घटना भोकरदन तालुक्यातील तपोवन तांडा येथे उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : वय कमी असल्याने पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून गर्भपात करण्यास भाग पाडून इतर दोन जणांसोबत अनैतिक संबंध ठेवण्यास प्रोत्साहन दिल्याची घटना भोकरदन तालुक्यातील तपोवन तांडा येथे उघडकीस आली. पीडितेच्या तक्रारीवरून पाच जणांविरूद्ध राजूर पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपोवन तांडा येथील बंडू चव्हाण याचा २०१८ साली गावातील एका मुलीशी आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर पत्नीस सासरच्या मंडळींनी दोन महिने चांगले नांदवले. त्यानंतर सासरच्यांनी तु छोट्या जातीची आहे. आम्हाला लागत नाही असे म्हणून तिला मारहाण केली. या दरम्यान तिला गर्भधारणा झाली. सदर बाब कुटूंबियांना सांगितल्यानंतर तुझे वय अजून कमी आहे. आम्हाला बाळ लागत नाही. याकारणावरून गर्भ पाडण्यात आला. त्यानंतर कुटुंबियांनी दोन जणांसोबत अनैतिक संबध ठेवण्यास प्रोत्साहन दिले. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पती, सासू, सासरा व इतर दोन जणांविरुध्द राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, सपोनि. सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुलाब पठाण तपास करीत आहेत.