जालना : शहरात सात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी ताब्यात घेतले. अशोक शामराव सुरासे (४०, रा. दत्तनगर जालना) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सोने- चांदीच्या दागिने असा ६ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जालना पोलीस दलाच्यावतीने तीन दिवस कोम्बींग आॅपरेशन राबविण्यात आले. यावेळी रेकॉर्ड वरील आरोपी, हिस्ट्रीशीट, माहीतगार गुन्हेगार, फरारी गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिली होते. या कोम्बींग ओपरेशन दरम्यान अटटल घरफोड्या करणारा आरोपी अशोक शामराव सुरासे हा मिळून आला. त्यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता, त्याने शहरात घरफोडी केल्याची कबुली दिली. अधिक विचारपूस केली असता, त्याने अजून सहा घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून २१ तोळे चोन्याचे दागिने, ०१ किलो ३०० ग्रॅम चांदीचे दागीने असा ६ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोउपनि. जयसिंग परदेशी, कर्मचारी कैलास कुरेवाड, सॅम्युअल कांबळे, प्रशांत देशमुख, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, रंजित वैराळ, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, मदन बहुरे, विलास चेके, हिरामण फलटणकर, विष्णु कोरडे, महिला कर्मचारी मंदा बनसोडे, शमशाद पठाण, जक्की पठाण यांनी केली.