गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:39 AM2018-09-12T00:39:15+5:302018-09-12T00:39:34+5:30

मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व बँक अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हा सहकार निबंधक नारायण आघाव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत सहकारी तसेच राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी तसेच रिझर्व बँकेचे प्रतिनिधी आणि मध्यवर्ती बँकेचे अधिकारी हजर होते.

Crop loan process in progress | गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पीककर्ज वाटप

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पीककर्ज वाटप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व बँक अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हा सहकार निबंधक नारायण आघाव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत सहकारी तसेच राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी तसेच रिझर्व बँकेचे प्रतिनिधी आणि मध्यवर्ती बँकेचे अधिकारी हजर होते.
यावेळी आघाव यांनी सांगितले की, गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पीककर्ज वाटप होत आहे. सर्व बँक तसेच तहसीलदार आणि सहकार विभागातील अधिकाºयांची बैठक घेतली. त्या बैठकीत तालुका निहाय मेळावे आयोजित करण्याचा निर्णय झाला.
त्यानुसार तहसील पातळीवर ही बैठक घेताना त्यात त्या तालुक्यातील बँकेचे अधिकारी, तहसीलदार, सहकार विभागाचे अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन आलेल्या कर्ज प्रकरणांमधील त्रुटी शोधून त्या दूर करण्याचे काम करण्यात आले.
याचा चांगला परिणाम म्हणून जालना जिल्हा टक्केवारीचा विचार करता मराठवाडा विभागात अव्वल स्थानावर आहे.
जिल्ह्यातील एक लाख ११ हजार शेतकºयांना ७२४ कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आल्याचे विविध बँकांच्या अधिकाºयांनी बैठकीत सांगितले.
खरीप हंगामानंतर आणि रबी हंगामातही पीककर्ज वाटप करण्यासाठीचे निर्देश आघाव यांनी बँकांना दिले आहेत.
जालना : पीकविम्याचा प्रश्न मार्गी लागणार
अनेक शेतकºयांनी गेल्यावर्षी जो पीकविमा काढला होता. त्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळतांना तांत्रिक अडचणी आल्या. यामुळे हजारो शेतकºयांना पीकविम्याची रक्कम मिळाली नव्हती. यासाठी नव्याने त्यांचा सर्व तपशील गोळा करून तो संबंधित विमा कंपनीकडे पाठविण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष देशमुख यांनी मंगळवारी झालेल्या बँकर्सच्या बैठकीत दिली.

Web Title: Crop loan process in progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.