जालना महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 01:08 AM2018-05-18T01:08:19+5:302018-05-18T01:08:19+5:30
जालन्यात तब्बल १६ वर्षानंतर जालना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सांस्कृतिक महोत्सवात अनेक दिग्गज कलावंताना निमंत्रित करण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालन्यात तब्बल १६ वर्षानंतर जालना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सांस्कृतिक महोत्सवात अनेक दिग्गज कलावंताना निमंत्रित करण्यात आले असून, जिल्ह्यातील कलाकारांनाही व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा लाभ जालनेकरांनी घ्यावा, असे आवाहनही लोणीकर यांनी गुरूवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
या महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता मंठा चौफुली जवळ उभरण्यात आलेल्या स्व. शारदादेवी पित्तीनगरात होणार आहे. महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम दररोज सायंकाळी सहा वाजता होणार आहेत. उद्घाटन शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे राहणार आहेत. यावेळी केंद्रीय सामजिक न्यायमंत्री रामदास आठवले, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. चंद्रकांत खैरे, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, आ. राजेश टोपे, आ. सुभाष झांबड, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, जि. प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उद्योजक राजेंद्र बारवाले, शांतीलात पित्ती, संजय राठी आदींची उपस्थिती राहणार आहे.
या महोत्सवाचा समारोप २२ मे रोजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या यांच्या उपस्थितीत होणार असून, या वेळी विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील, धनंजय मुंडे, आयुक्त पुरूषोत्तम भापकर आदींची उपस्थिी राहणार असल्याची माहिती लोणीकर यांनी दिली. पत्रकार परिषदेत वीरेंद्र धोका, उद्योजक घनशाम गोयल, भावेश पटेल, सुदेश करवा, बंडू मिश्रीकोटकर उमेश पंचारिया यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आज शोभायात्रा
जालना महोत्सवात जालेनकरांनी सहभागी व्हावे या हेतूने शुक्रवारी शहरातील मंमादेवी मंदिरापासून शोभायात्रेचे आयोजन सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे. यात अनेक कलाकार सहभागी होणार आहेत.