लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विविध मागण्यांसाठी आशा- गटप्रवर्तकांनी ३ सप्टेंबरपासून कामावर बहिष्कार टाकला आहे. कामावर बहिष्कार टाकणाऱ्या आशांना सीईओ निमा अरोरा यांनी नोटिसा पाठवल्या होत्या. या कारवाईविरोधात सोमवारी आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून आंदोलन केले. आंदोलनानंतर सीईओ निमा अरोरा यांनी सदरील कारवाई मागे घेतली.मानधन वाढीचा शासकीय निर्णय सरकारने काढावा, या प्रमुख मागणीसाठी ३ सप्टेंबरपासून आशा वर्कर्सने कामावर बहिष्कार टाकला. त्यामुळे आरोग्य विभागाची कामे ठप्प झाली असून, ज्या आशा वर्कर्सनी कामावर बहिष्कार टाकला आहे. त्यांनी तात्काळ कामावर रूजू व्हावे, अशा नोटीसा मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी काढल्या होत्या. या कारवाईच्या विरोधात सोमवारी आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर व सीईओ निमा अरोरा यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यकार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी कारवाई मागे घेतली.यावेळी कामगार नेते अण्णा सावंत, गोविंद आर्दड, कल्पना आर्दड, कुंदा बादल, ज्योती जिने, मिना ठोंबरे आदींची उपस्थिती होती.शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी उपोषणजालना : प्रशासनाने आर. टी. ई. अॅक्ट २००९ चा भंग करून नियमबाह्य, अनावश्यक व अनधिकृत ५ वी व ८ वीचे वर्ग सुरू केले आहे. हे वर्ग तात्काळ बंद करण्यात यावे, या मागणीसाठी शिक्षकांनी सोमवारपासून जि.प. कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.यावेळी आर. ए. पाटील, एस. एम. आरसूळ, के. आर. बोर्डे, एस. बी. राठोड, एल. बी. जाधव, ए. डी. मुळे, वाय. आर. टेके, एस. ए. आमले, एम. एम. शेळके, एल. आर. कुºहाडे, डी. एच. कोल्हे, एस. एच. पाटील, यु. आर. म्हस्के, सचिन देशमुख, सतीश कुभफळे, एस. के. पटेल होते.रस्ता पूर्ण करण्याच्या मागणीसाठी उपोषणविरेगाव व विरेगाव तांडापर्यंत अपूर्ण रस्ता पूर्ण करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता अपूर्ण आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना मोठी अडचण निर्माण होत आहे. हा रस्ता तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहील, अशा इशारा देण्यात आला.
आंदोलनाचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:51 AM