लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कोरोना या विषाणूमुळे संपूर्ण जग हादरले आहे. याचा सामना अर्थात त्या विषाणूशी दोन करतांना वैद्यकीय क्षेत्रासमोर एक आव्हान आहे. परंतु या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून गर्दी टाळणे आणि स्वच्छता राखणे हाच यावर एक ठोस इलाज सध्या तरी उपलब्ध आहे. जो की, सर्व सामान्य माणसाच्या हातात आहे. परंतु ते देखील होताना दिसत नाही. संचारबंदी असतांनाही अनेकजण बिनधास्तपणे एकत्रित येतानाचे वास्तव सर्वत्र पाहायला मिळत आहे. हे टाळण्याची गरज असून, कोरोनाचा सामना करतांना अनेकजण जिवाचे रान करून सामान्यांसाठी आहोरात्र झटत आहेत.अशा सर्वांचे स्वागत शंखनाद, टाळ्या, थाळ्या वाजूवन करण्यात आले. परंतु येथील लेखक, कवी, नाटककार आणि संस्कृतचे शिक्षक असलेल्या विनोद जैतमहाल यांनी एका गीतातून सर्व सार मांडले आहे.कोरोनामुळे सर्वत्र हाहा:कार उडाला आहे. ज्याच्या तोंडी सध्या एकच शब्द तो म्हणजे कोरोना विषाणूचा आहे. या विषाणूने जगभर आपले हातपाय पसरण्यास प्रारंभ केला आहे. त्यात प्रगत देशही अपवाद नसून, तेथील अद्ययावत वैद्यकीय सुविधाही या विषाणू समोर हतबल झाल्या आहेत.आपला भारत तर एक मोठा खंडप्राय देश असून, येथे लोकसंख्येची घनताही चीननंतर सर्वात जास्त आहे. त्यामुळे येथे खबरदारी हाच एक पर्याय आपल्या जीवन-मरणाच्या मध्ये अंतर निर्माण करू शकतो. या आजाराशी दोन हात करताना डॉक्टर, परिचारिका, अन्य वैद्यकीय स्टाफ तसेच पोलीस आणि अन्य इतर व्यक्ती हे आपले सर्वस्व पणाला लावून लढा देत आहेत. त्यांचे आपण कुठेतरी देणे लागतो. या हेतूने येथील उद्योजक सुनील रायठठ्ठा यांनी पुढाकार घेत विनोद जैतमहाल यांच्याकडून कोरोनावर आधारित एक गीत लिहून आणि त्यांनाच ते गायला लावले. त्यांच्या गाण्यामुळे कोरोनाबात जागृती होण्यास मदत होत आहे.जिद्दी कलाकाराने जबाबदारी संभाळलीही त्यांची संकल्पना साकार करताना जैतमहाल यांची कसोटी लागली. परंतु त्यांनी त्यांच्यातील जिद्दी कलाकाराने ही जबाबदारी लीलया सांभाळून चार कडव्यांचे अत्यंत आकर्षक गाणे तयार केले. त्यातून त्यांनी पंतप्रधान मोदींना अपेक्षित असलेले सेवा करणाऱ्यांचे सर्वांगाने यशस्वी करून दाखविले. त्यांना येथील संगीतकार विनोद कांबळे यांचीही मोलाची साथ मिळाली.४कांबळे यांनी रात्र जागून काढत या गाण्याला संगीताचा साज चढविला. आणि यातूनच हे गाणे तयार झाल्याचे जैतमहाल यांनी सांगितले. यासाठी त्यांना जेबी स्टुडीची देखील मदत झाल्याचे ते म्हणाले.
घातक अदृश्य शत्रू... हर मनुष्य है रणभूमी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:02 AM