जालना जिल्ह्यात दीपावली उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 12:09 AM2018-11-08T00:09:42+5:302018-11-08T00:10:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : जालना शहर व जिल्ह्यात दिवाळी परंपरागत उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी सहा वाजेनंतर लक्ष्मीपूजन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहर व जिल्ह्यात दिवाळी परंपरागत उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी सहा वाजेनंतर लक्ष्मीपूजन करण्यात आले. यावेळी फटाके फोडण्याची वेळ न्यायालयाच्या आदेशानुसार सायंकाळी सात ते दहा एवढीच असल्याने त्याचा चांगला परिणाम फटाके फोडणाऱ्यावर झाल्याचे दिसून आला.
यंदाच्या दिवाळीवर दुष्काळाचे सावट स्पष्टपणे दिसत होते. बाजारपेठेत दिवाळीच्या केवळ दोन दिवस आधी थोडीफार गर्दी झाली. घरातील लहान मुलांसाठी दुष्काळाची छाया बाजूला ठेवून, त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकांनी बाजारपेठ गाठली होती. पूर्वी प्रमाणे उत्साह बाजारपेठेत दिसून आला नाही. असे असले तरी, चारचाकी आणि दुचाकी खरेदीला मोठा प्रतिसाद दिसून आला. वित्तीय संस्थांकडून यासाठी कर्ज देण्यासाठी जणूकाही स्पर्धा सुरू असल्याने त्याचा लाभ ग्राहकांना झाला. परंपरागत लक्ष्मीपूजनाने दिवाळी साजरी करण्यात आली. मोंढा परिसरात पाडव्याला पूजा होते.
जालना : झेंडू शंभर रूपये किलोवर
जालना शहर व परिसरात दिवाळी दोन दिवस आधी पाऊस पडल्याने झेंडूच्या फुलांचा दर्जा घसरलेला दिसून आला. दिवाळीच्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी झेंडूची फुले ही २० ते ४० रूपये किलोने विक्री होत होते. तर दुपारनंतर जसजसा माल कमी शिल्लक राहिल्याचे शेतक-यांच्या लक्षात आल्यावर झेंडू फुलांचे भाव हे चक्क ८० ते १०० रूपये किलोवर पोहचले होते. यामुळे ग्राहकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले गेले. दस-याला शेतक-यांच्या झेंडूच्या फुलांना भाव कमी मिळाल्याने शेतकरी हिरमुलसले होते. यंदा मात्र दिवाळी दुपारनंतर दस-याच्या नुकसानीची कसर भरून काढल्याची भावना शेतक-यांमध्ये होते.