जिजाऊ द्वाराच्या दुरूस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:27 AM2021-01-18T04:27:45+5:302021-01-18T04:27:45+5:30
पालकमंत्री राजेश टोपे यांचा सत्कार जालना : शहरातील जिल्हा रूग्णालयात कोरोना लसीकरणाच्या प्रारंभ ...
पालकमंत्री राजेश टोपे यांचा सत्कार
जालना : शहरातील जिल्हा रूग्णालयात कोरोना लसीकरणाच्या प्रारंभ प्रसंगी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींची उपस्थिती होती.
मॅरेथॉन स्पर्धेवर आधारित मराठी पुस्तकाचे विमोचन
जालना : मॅरेथॉन स्पर्धेवर आधारित मराठी भाषेतील पहिल्या पुस्तकाचे राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. यावेळी कैलास सचदेव, डॉ. राजीव जेथलिया, डॉ. संजय अंबेकर, केदार मुंदडा यांच्यासह शहरातील पदाधिकारी, सदस्यांसह नागरिकांची उपस्थिती होती.
अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईची मागणी
जाफराबाद : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे. तळीरामांमुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय महिला मुलींनाही नाहक त्रास सहन करावा लागत असून, युवा पिढीही व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस दलाच्या वतीने अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महिला वर्गातून केली जात आहे.