जालना : तालुक्यातील बठाण बु. येथे पंतप्रधान घरकूल अवास योजनेत भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशीसाठी करावी अशी मागणी करत २५ ते ३० महिला व पुरुषांनी आंदोलन केले. आंदोलकांनी शाबीर अली चौकातील नगर पालिकेच्या जलकुंभावर चढून त्वरित कारवाईची मागणी केली.
बठाण बु येथे १ नोव्हेंबर रोजी घरकुल घोटाळ््या प्रकरणाची तसेच इतर कामाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने समिती पाठवली होती. परंतु, या समितीने योग्य चौकशी न करता सरपंच व त्यांच्या सहकार्याच्या मदतीने बोगस चौकशी केली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी वेळोवेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आली. परंतु, कुठल्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली नाही असा आरोप करत ग्रामस्थांनी या कामाची चौकशी त्वरीत अशी मागणी केली. गावातील महिला व पुरुषांनी शहरातील शाबीर अली चौकातील नगर पालिकेच्या जलकुंभावर चढून आंदोलन केले. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे व जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांना देण्यात आले.
याप्रसंगी यशोदा वखारे, कांताबाई सोमधाने गंगू कोलते, सौमित्रा सुतार, गयाबाई साठे, शशिकला डोंगरे, धुरु सुतार, पदमाबाई कांबळे, नारायण बागल, श्रीहरी बागल, सुरेश जगधने, मिना कांबळे, गोंदणबाई जगधने, विमलबाई जगधने, धोंडाबाई देवडे आदींची उपस्थिती होती.