चार विद्युत खांबांची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:43 AM2019-12-20T00:43:03+5:302019-12-20T00:43:16+5:30
बोरी- बोरगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठ्याबाबत शेतकऱ्यांमध्ये झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. उपकेंद्रातून येणारा वीजपुरवठा बुधवारी बंद असल्याने संतप्त काहींनी चिंचखेडा गावाकडे जाणाºया तीन विद्युत खांबांची तोडफोड केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : बोरी- बोरगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठ्याबाबत शेतकऱ्यांमध्ये झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. उपकेंद्रातून येणारा वीजपुरवठा बुधवारी बंद असल्याने संतप्त काहींनी चिंचखेडा गावाकडे जाणाºया तीन विद्युत खांबांची तोडफोड केली आहे.
बोरी - बोरंगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्रात केवळ एकच पाच एमव्हीए ट्रान्सफॉर्मर आहे. दाहा ते अकरा गावांना वीज जोडणी केली आहे. त्यामुळे यावर वाजवीपेक्षा अधिकचा लोड वाढल्याने एकही गावाला वीज पुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे हे प्रकरण चिघळले आहे. रबी हंगाम सुरू झाल्यापासून एक दिवसाआड; तीही आठ तास वीज मिळत होती व तीही अत्यंत कमी दाबाने. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळत आहे. चिंचखेडा गावासह उपकेंद्रला जोडण्यात येणाºया गावातील सर्वच कृषी पंपांचा वीज पुरवठा बंद असताना मध्येच पोल पडण्याची घटना घडली आहे. हा वाद आता शेतकऱ्यांनी पोलिसांत नेला असून, या विषयी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि पोलीस कोणती भूमिका घेतात, याकडे पाहावे लागणार आहे. जाफराबाद पोलीस ठाण्यात चिंचखेडा येथील शेतकरी गुन्हा दाखल करण्याच्या मागणी करीत ठाण मांडून बसले होते. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.