लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने वाढविलेल्या वसतिगृहाच्या फीसच्या निषेधार्थ व इतर विविध मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थीआंदोलनच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्या आंदोलनामुळे पूर्ण दिल्ली ठप्प पडली होती. मात्र, विद्यार्थ्यांचा आक्रोश जेएनयू प्रशासनाने लक्षात घेतला नाही आणि वसतिगृहाची फी ३०० पट वाढवली. त्याच्या निषेधार्थ जेएनयूचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.त्यांना दिल्ली पोलीस प्रशासनाने अत्यंत वाईट पद्धतीने वागणूक दिली. त्यांच्यावर लाठीमार केला.त्या घटनेच्या निषेधार्थ व जेएनयू मधील विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भातचे निवेदन सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रत्नपारखे, महाराष्ट्र सदस्य तथा जिल्हाउपाध्यक्ष राहुल भालेराव, जिल्हाउपाध्यक्ष सचिन वाघमारे, वैभव वानखेडे, राहुल बनसोडे, सुनील वाघमारे, मंगेश शिंदे, नितेश शिंदे, शुभम साळवे, वैभव दाभाडे, स्वप्नील सावळे, शरद हिवाळे, बालाजी खरात, राज आदमाने, अनिल पवार, राहुल हिवाळे, स्वप्नील सावळे, सूरज सोनवणे, प्रवीण साबळे, राहुल खरात, विशाल साळवे, बाबासाहेब खरात, सुनील वानखेडे आदी उपस्थित होते.
सम्यक विद्यार्थी आंदोलनची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:49 AM