शिवनाम सप्ताहात वांजुळे यांचा सत्कार
जालना : शहरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोपप्रसंगी चितळी - पुतळीच्या सरपंचपदी स्वप्ना राजेंद्र वांजुळे यांचा नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लिंगायत समाज बांधव व श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमास लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाहतूक नियमांबाबत जनजागृती मोहीम
बदनापूर : तालुक्यातील केळीगव्हाण येथील मदन बहुउद्देशिय सेवाभावी संस्था व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने विविध ठिकाणी वाहतूक नियमांबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. शाळा, महाविद्यालयांसह खासगी वाहन चालकांना वाहतूक नियम पालनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास चालकांचा प्रतिसाद लाभला.
गांधी महाविद्यालयात राजभाषा दिन साजरा
जालना : शहरातील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात शनिवारी राजभाषा मराठी दिन साजरा करण्यात आला. यावेळी संतश्रेष्ठ रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास प्राचार्या डॉ. सुनंदा तिडके, प्रा. डॉ. शोभा यशवंते, प्रा. डॉ. उमेश मुंढे, प्रा. डाॅ. दादासाहेब गिऱ्हे आदींची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
वरूड बु : येथील आरोग्य केंद्रात आयोजित कार्यक्रमात आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तम वानखेडे, डॉ. डी. एम. पाटील, डॉ. एम. एल. मोटे, डॉ. विशाल काटकर, डॉ. पी. एस. सोनटक्के, डॉ. एम. के. मोटे, बी. के. लहने आदींची उपस्थिती होती.