लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शेगाव ते पंढरपूर मार्ग व्हावा म्हणून आपण दिल्ली पर्यंत धडक मारून तो मंजूर करून घेतला. त्याचे काम आता अंतिम टप्प्यात सुरू आहे. हा मार्ग राज्यासाठी एक मॉडेल ठरेल, असा विश्वास पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.शेगाव, खामगाव ते पंढरपूर मार्गे लोणार-मंठा-परतूर-आष्टी-लोणी-माजलगाव या महामार्गाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. सध्या या रस्त्याचे काम वेगात सुरू असून परतूर मतदारसंघात या रस्त्याची लांबी ९५ किलो मीटर आहे.या रस्त्याचे काम हैदराबाद येथील कंपनीला देण्यात आले असून, त्यांचे काम आॅगस्ट २०१७ ला सुरू झाले असून हा संपूर्ण रस्ता त्यांना ३० महिन्यात पूर्ण करायचा आहे संपूर्ण रस्ता हा सिमेंट काँक्रीटचा असून त्यामुळे येणाऱ्या काळात सुसज्ज अद्ययावत सिमेंट रस्ता पाहायला मिळेल. असेही लोणीेकर यांनी मंठा येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.परतूर : काम गतीने करण्याच्या सूचनाहा महामार्ग मंजूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकर यांची मोठी मोलाची मदत झाली. या रस्त्यावर काही ठराविक अंतरावर वारक-यासांठी विश्रामगृहत सेच अन्य सोयी-सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे. हे काम गतीने करण्याच्या सूचना हैदराबाद येथील कंपनीला देण्यात आल्या आहेत. गती सोबतच दर्जा राखण्याचे निर्देशही बबनराव लोणीकरांनी दिले.
दिंडी महामार्ग ‘मॉडेल’ ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 12:45 AM