लोकमत न्यूज नेटवर्कजालना : संपूर्ण राज्य आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्डस’ चे सोमवारी २५ फेब्रुवारी रोजी मधुर बॅक्वेट हॉल, दुर्गामाता रोड जालना येथे सकाळी साडेअकरा वाजता वितरण होणार आहे.ज्युरी मंडळाकडे जिल्ह्यातील सरपंचांचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे.गावाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या व त्या स्वप्नांना मूर्तरुप देण्यासाठी झटणाºया मेहनती व कर्तबगार विजेत्या संरपंचांना फळबाग तज्ञ तथा गट शेतीचे प्रणेत डॉ. भगवान कापसे यांच्या हस्ते‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, कृषीभूषण भगवान काळे, कृषीभूषण सिताबाई मोहिते, प्रमुख मार्गदर्शक कृषीभूषण उध्दव खेडेकर हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहे.बीकेटी टायर्स या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक तर पतंजलि आयुर्वेद सहप्रायोजक आहे.सलग दुसºया वर्षीही या पुरस्कारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. पुरस्कारासाठी प्रचंड चुरस आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. या सोहळ््यास जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ‘लोकमत’ च्या वतीने करण्यात आले आहे.११ कॅटेगरी, दोन विशेष पुरस्कारसरपंचांनी गावात जल, वीज, व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन- लोकसहभाग, रोजगार व कृषी या ११ कॅटेगरीत केलेल्या कामांची पाहणी करून या प्रत्येक क्षेत्रासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय उदयोन्मुख नेतृत्व आणि सरपंच आॅफ द इयर हे दोन विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे.सरपंचांना उपस्थित राहण्याचे आवाहनजालना येथे सरपंच अॅवार्ड कार्यक्रमाचे वितरण सोमवारी सकाळी ११.३० मधुर बॅक्वेट हॉल, दुर्गामाता रोड जालना (मशीन हॉस्पिटलसमोर) येथे करण्यात येणार आहे. सरपंच अॅवार्डसाठी अर्ज भरलेल्या सरपंचांप्रमाणेच अन्य गावातील सरपंचांनाही सोहळ्यास उपस्थित राहता येणार आहे.
आज जालन्यात होणार ‘सरपंच अवॉर्ड’ पुरस्काराचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:15 AM