लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे जिरायत आणि फळबागेचे झालेले मोठे नुकसान तसेच केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा शनिवारी येथील तहसील कार्यालयात भेट देऊन जिल्हाधिका-यांनी आढावा घेतला.यावेळी सामान्य प्रशासनाने उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, तहसीलदार डॉ. बिपिन पाटील, नायब तहसीलदार अतुल निकम, निराधार विभागाच्या नायब तहसीलदार आर.बी. चामनर, महसूलचे नायब तहसीलदार गणेश पोलास आदी उपस्थित होते. पर्जन्यमान कमी झाल्याने खरीप, रबी आणि फळबागेचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी संकटात सापडले. यामुळे शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन शेतक-यांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते. महसूल प्रशासनाने खरीप आणि फळबागेचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या याद्या तयार करण्याचे काम सध्या महसूल प्रशासनाकडून युध्दपातळीवर सुरु आहे. जालना तालुक्यातही दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. जालना तालुक्यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात नुकसानीचे भरपाईसाठी १६ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. शनिवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तहसील कार्यालयात भेट देऊन दुष्काळी अनुदानाच्या यादी, आणि प्रधानमंत्री किसान योजनेच्या याद्याचा आढावा घेतला.रविवारी राहणार तहसील कार्यालय सुरुजालना तालुक्यासाठी दुष्काळी अनुदानाचे १६ कोटी रुपये तहसील प्रशासनाला प्राप्त झाले आहे. त्यापैकी १३ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित शेतक-यांच्या याद्यांचे वाटप तात्काळ करावे यासाठी रविवारी देखील तहसील कार्यालय सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला दुष्काळी अनुदानाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:20 AM