त्याचा चांगला परिणाम आता दिसत आहे. जालन्यात प्रथम संजय अग्रवाल यांचे दोन ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट होते. त्यातून ते औद्योगिक कारखान्यांसह खासगी रुग्णालयांना गरजेनुसार ऑक्सिजन तसेच नायट्रोजनचा पुरवठा करत होते. मध्यंतरी त्यांच्याकडील सर्व ऑक्सिजन हा शासनाने स्वत:कडे घेऊन उद्योगांऐवजी तो रुग्णांसाठीच देणे बंधनकारक केले होते. त्यामुळे उद्योग अडचणीत सापडले होते. उद्योगांमध्ये वेगवेगळ्या महत्त्वाच्या कामांसाठी ऑक्सिजन सिलिंडरची गरज पडते. ही बाब लक्षात घेऊन येथील चार स्टील उद्योजकांनी स्वत:चे ऑक्सिजन प्लांट उभारले आहेत; परंतु सध्या गरजेपेक्षा जास्त ऑक्सिजन विविध रुग्णालयांकडे असून, तो पुरेसा असल्याने या प्लांटचे उत्पादन हे मर्यादित केले जात आहे.
चौकट
८० लाखांचा हवेतून ऑक्सिजनचा प्लांट कार्यान्वित
जालना जिल्हा रुग्णालयात ऑक्स एअर या ऑस्ट्रेलियन कंपनीने त्यांच्या सीएआर फंडातून ८० लाख रुपये खर्चाचा हवेतून ऑक्सिजन घेऊन तो थेट गरजू रुग्णांना देण्यासाठीचा प्लांट शुक्रवारी प्रत्यक्षात सुरू झाला. यातून ६०० एलपीएम एवढा ऑक्सिजन निर्मिती होणार असल्याची माहिती या कंपनीचे तंत्रज्ञ इक्बाल महात यांनी सांगितली. दरम्यान डीआरडीओकडूनही यापेक्षा अधिक ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती अतरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रताप घोडके यांनी दिली. यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांची मदत झाल्याचेही डॉ. घोडके म्हणाले.