लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा ग्रंथालय इमारतीच्या परिसरात वृक्षारोपणासह सुशोभिकरण करणारी महत्वपूर्ण कामे नगर परिषदेच्या माध्यमातून लवकरच केली जाणार आहे. तसेच जिल्हा ग्रंथालयाचा लौकिक वाढेल यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली आहे.ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय जालना यांच्या विद्यमाने जालना ग्रंथोत्सवाचे मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात उद्घाटन शुक्रवारी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. तत्पूर्वी ग्रंथदिंडी काढण्यात आली होतीकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील होसे होते. यावेळी मसापच्या संचालिका डॉ. संजीवनी तडेगावकर, राजेश राऊत, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी वाचनाविषयी बालपणापासून निर्माण झालेली आवड व अन्य आठवणींना त्यांनी उजाळा दिला. अध्यक्षीय समारोपात सुनील हुसे यांनी वाचक निर्माण व्हावेत, आणि ग्रंथविक्री मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी ग्रंथालयांनी जबाबदारीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.प्रारंभी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी प्रा. बी. वाय. कुलकर्णी, प्रा. बसवराज कोरे, पंडित तडेगावकर, शिवाजी कायंदे, किशोर घोरपडे, रावसाहेब ढवळे, शशिकांत पाटील, पांडुरंग सांगळे, शोभा यशवंते, ज्योती धर्माधिकारी, राजाराम जाधव, श्रीकांत गायकवाड, एस. एन. कुलकर्णी, सतीश लिंगडे, पवन जोशी, सुमीत शर्मा आदींची उपस्थिती होती.ग्रंथोत्सवाच्या सायंकाळच्या चौथ्या सत्रात ‘आठवण माझी काढत जा तू, एक लिफाफा धाडत जा तू’ , ही कविता संतोष नारायणकर यांनी सादर केली. तर ‘कण्हत कुथत बितलेल्या रात्रीनंतर येणारा सूर्योदय मला दिसतो मायच्या जीर्ण झालेल्या लुगड्यावरील थिगळासारखा’...ही कविता कवी साहिल पाटील यांनी सादर केली. यावेळी प्रा. एकनाथ शिंदे, विजय जाधव, राज रणधीर, आदींनी बहारदार कविता सादर केल्या.
जिल्हा ग्रंथालयाच्या वैभवात भर घालणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 1:09 AM