बँकांनी कर्ज न वाटल्यास ठेवींचा पुनर्विचार करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 01:15 AM2018-06-29T01:15:35+5:302018-06-29T01:16:54+5:30

शेतकऱ्यांना पीककर्ज देताना ज्या बँका हात आखडता घेतली अशा बँकेतील ठेवी काढून घेण्यास आम्ही मागे-पुढे पाहणार नसल्याचा इशारावजा दम परिवहन मंत्री तथा छत्रपती शिवाजी महाराज कर्ज वाटप समन्वय समितीचे सदस्य दिवाकर रावते यांनी बँकेच्या अधिका-यांना गुरूवारी दिला.

Diwakar Raote warns banks regarding crop loans | बँकांनी कर्ज न वाटल्यास ठेवींचा पुनर्विचार करू

बँकांनी कर्ज न वाटल्यास ठेवींचा पुनर्विचार करू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आज अनेक राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणेच खाजगी बँकांमध्येही शासनाच्या विविध योजनांसाठी आलेला निधी ठेव स्वरूपात ठेवला जातो. असे असताना शेतकऱ्यांना पीककर्ज देताना ज्या बँका हात आखडता घेतली अशा बँकेतील ठेवी काढून घेण्यास आम्ही मागे-पुढे पाहणार नसल्याचा इशारावजा दम परिवहन मंत्री तथा छत्रपती शिवाजी महाराज कर्ज वाटप समन्वय समितीचे सदस्य दिवाकर रावते यांनी बँकेच्या अधिका-यांना गुरूवारी दिला.
रावते यांच्या अध्यक्षतेखाली पीककर्ज आढावा बैठक सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यातील पीककर्ज वाटपाची सविस्तर माहिती दिली. त्यात आता पर्यंत ३९ हजार शेतकºयांना २१५ कोटी ६८ लाख रूपयांचे पीककर्ज वाटप केल्याचे सांगितले. ही पीककर्ज वाटपाची गती आणखी वाढवण्याचे निर्देश रावते यांनी दिले. कर्जमाफी अंतर्गत ज्यांना दीड लाख रूपयांपर्यंतची कर्जमाफी झाली आहे, अशा शेतक-यांना तातडीने कर्जपुरवठा करण्याचे सांगितले. नवीन कर्ज घेण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, याचा तपशील शेतकºयांपर्यंत पोहचत नसल्याने अडचण येत असल्याचे ते म्हणाले. पुनर्गठनाच्या मुद्याचाही आढावा त्यांनी घेतला. यंदा जिल्ह्यातील ९५ हजार शेकºयांना नव्याने कर्ज मिळणार असल्याची माहिती जिल्हा सहकार निबंधक नारायण आघाव यांनी दिली. तसेच पीककर्ज वाटपासाठी जिल्हाधिका-यांच्या सूचनेनुसार सहकार आणि महसूल विभागाच्या माध्यमातून संयुक्त मेळावे घेत असल्याने त्याचा चांगला परणिाम पीककर्ज वाटपावर झाल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले.
बँक अधिका-यांनी मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने कर्जवाटपात गती येत नसल्याची माहिती दिली. आढावा बैठकीस जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, आमदार नारायण कुचे, माजी आमदार संतोष सांबरे, भास्कर अंबेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा उपनिबंधक एन.व्ही आघाव, अग्रणी बँक अधिकारी श्री इलमकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, उप विभागीय अधिकारी केशव नेटके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जालना : बदनापूर कर्ज वाटप पॅटर्न राबवा
बदनापूर येथील तहसीलदार प्रवीण पांडे आणि तालुका सहकार निबंधक ए.बी.काशीकर यांनी बदनापूर तहसील कार्यालयात कर्जमाफीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. यात नायबतहसीलदारासह मंडळ अधिकारी, तलाठी आणि संगणक आॅपरेटरचा समावेश आहे. येथे येणा-या शेतक-यांना आवश्यक असणारी कागपत्रे उपलब्ध करून देण्यात येत आहे. याचा तपशील दिवाकर रावते यांच्या समोर मांडण्यात आला. एकट्या बदनापूर तालुक्यास ५३ कोटी २५ लाख रूपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते पैकी २८ जूनपर्यंत २६ कोटी ८५ लाख रुपयाचे वाटप करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे या पॅटर्ननुसार पीककर्जाचे नियोजन करण्याच्या सूचनाही रावते यांनी दिल्या.

Web Title: Diwakar Raote warns banks regarding crop loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.