‘डीआरएम’नी केली अधिकाऱ्यांना झापाझापी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:36 AM2018-11-27T00:36:02+5:302018-11-27T00:36:37+5:30
रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक त्रिकालाज्ञ राभा यांनी येथील रेल्वेस्थानकाची सोमवारी नियोजित दौºयात तब्बल एक तास पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक त्रिकालाज्ञ राभा यांनी येथील रेल्वेस्थानकाची सोमवारी नियोजित दौºयात तब्बल एक तास पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वच्छता, दुचाकी पार्किंग, फुटलेल्या फरशा यासह अन्य मुद्यावरून अधिका-यांची चांगलीच कानउघाडणी केली.
दरम्यान त्यांनी केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना अनेक अधिका-यांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे दिसून आले. डीआरएम यांचा नियोजित दौरा असल्याने येथील प्रशासनाने गेल्या पंधरा दिवसांपासून रेल्वेस्थानक परिसरातील सर्वच परिसराची रंगरंगोटी केली होती. डीआरएम हे किती वेळ थांबणार याची कसलीही पूर्व सूचना नसल्याने अनेकांनी त्यांच्या दौ-याला विशेष महत्व दिलेले नव्हते.
सोमवारी त्यांचे ४ वाजता रेल्वेस्थानकावर आगमन झाले. यावेळी त्यांनी सर्वप्रथम रेल्वेपटरीची पाहणी करित तिचा गंज काढून ग्रीसिंग करण्याचे सांगत रेल्वेफाटकावरील स्टिकर नवीन लावण्याचे आदेश दिले. यानंतर जवळच असलेल्या रस्त्यावरील गतिरोधकाची पाहणी करून हे कधी बनवले, असा सवाल केला. बनविताना रेल्वे रुळापासून किती अंतर सोडले याचे मोजमाप केले काय, कामाची तपासणी केली का, असे अनेक प्रश्न विचारीत अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले होते.
यानंतर त्यांनी आपला मोर्चा स्थानकाबाहेर वळविला असता तेथे त्यांना अनेक दुचाकी उभ्या असल्याचे दिसले, त्यांनी ही पार्किंगची जागा आहे काय, अशी विचारणा केली असता, अधिका-यांनी याचे उत्तर नाही असे दिले. त्यांनी तातडीने येथून सर्व दुचाकी हटविण्याचे आदेश दिले. पार्सल रूमकडे जाऊन त्यांनी तेथील लोंबकळलेल्या केबल पाहूनही तीव्र नाराजी व्यक्त करून अधिकाºयांना धारेवर धरले. तसेच तेथील अस्वच्छतेच्या मुद्यावरूनही ते जाम चिडले होते.
यावेळी डीआरएम यांनी पुरूष, महिला प्रतीक्षालय, उपाहारगृह, उपअधीक्षक कार्यालयातील घटना नोंद रजिस्टर, ओव्हरब्रिजची पाहणी केली. यासह अन्य प्रशासकीय कामकाजात सुधारणा करण्याचेही निर्देश यावेळी देण्यात आले.