लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बऱ्याच वर्षानंतर आलेले कंकणाकृती सूर्यग्रहणावर गुरूवारी ढगांची गडद छाया पसरल्याने ग्रहणांचे निरीक्षण करणारे अभ्यासक आणि विद्यार्थी हिरमुसले होते. सकाळी आठ वाजेपासूनच विद्यार्थी आणि प्राध्यापक, शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष चष्मे तसेच टेलिस्कोपची व्यवस्था केली होती. येथील बद्रीनारायण बारवाले तसेच जेईएस महाविद्यालयासह सारवाडी येथील जिल्हा परिषद शाळा आणि वाल्हा येथील लक्ष्मणनगर तांडा येथील जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ग्रहण पाहण्याची व्यवस्था केली होती.बद्रीनारायण महाविद्यालयातील प्रा. प्रवीण कोकणे यांनी या ग्रहणाचा अभ्यास खगोलप्रेमी विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून यापूर्वीच नियोजन केले होते. त्यानुसार ५० ते ७० मुले-मुली सकाळीच महाविद्यालयाच्या गच्चीवर जमले होते. प्रारंभी कोकणे यांनी या ग्रहणाचे वैशिष्ट्य विशद करून सांगितले. प्रारंभी आकाशात ढगांची मोठी गर्दी असल्याने ग्रहण दिसण्यास बरीच प्रतीक्षा करावी लागली. नऊ वाजेनंतर ढगांची अल्पशी गर्दी हटल्यावर हे ग्रहण विद्यार्थ्यांना पाहता आल्याचे कोकणे म्हणाले.भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने या विशेष नैसर्गिक घटनेचे विश्लेषण करण्यात आले.
ढगांच्या छायेने ग्रहण अभ्यासक हिरमुसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 12:51 AM