महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 12:40 AM2019-11-29T00:40:28+5:302019-11-29T00:41:07+5:30

राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर गुरूवारी दिवसभर जालना शहरासह ग्रामीण भागातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससह इतर मित्रपक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.

The excitement of the establishment of power leading to development | महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा जल्लोष

महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा जल्लोष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर गुरूवारी दिवसभर जालना शहरासह ग्रामीण भागातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससह इतर मित्रपक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.
शहरातील गांधी चमन भागात शिवसेनेच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी युवा सेनेचे राज्य संपर्कप्रमुख अभिमन्यू खोतकर यांच्यासह भरत कुसुंदल, नगरसेवक गोगडे यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.
काँग्रेसच्या वतीनेही फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत, अल्पसंख्याक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बदर चाऊस, जिल्हा सरचिटणीस राजेश काळे, शेख रऊफ परसूवाले, जिल्हा उपाध्यक्ष विजय चौधरी, सभापती जीवन सले, रमेश गौरक्षक, आरेफ खान, वाजेदखान, शेख शकील, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष वैभव उगले, फकीरबा वाघ, सय्यद जावेद अली, नदीम पहेलवान, गणेश वाघमारे, अ‍ॅड. राहुल चव्हाण, अ‍ॅड. रोहित बनवस्कर, अ‍ॅड. शेख मुजम्मिल, अ‍ॅड. सय्यद अमजद, अजीम बागवान, शिवराज जाधव, जॉर्ज उगले यांच्यासह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. जुना जालना भागातील शनि मंदिर, गणपती गल्ली, भाग्यनगर येथेही फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
भोकरदन, वडीगोद्री, अंबड, परतूर, मंठा, बदनापूरसह ग्रामीण भागात ठिकठिकाणच्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आतषबाजी करीत, पेढे वाटून सरकार स्थापनेचा जल्लोष केला.

Web Title: The excitement of the establishment of power leading to development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.