निळकंठनगर येथील अमोल गोरे यांच्यावर रणधीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मयताचे नातेवाईक राजेंद्र गोरे, संभाजी गोरे, तान्हाजी गोरे (रा. निळकंठनगर, जुना जालना) हे रुग्णालयात आले. तू किडनी फेल करून आमच्या नातेवाइकास का मारले, असे म्हणून तिघांनी राज रणधीर यांच्यासह त्यांच्या आई-वडील, पत्नी व भावास चापटबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली. त्यांनी हॉस्पिटलच्या केबिनमधील सामानाचे व चारचाकी, दुचाकी वाहनांचे नुकसान केले. याप्रकरणी राज दत्तात्रय रणधीर यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र गोरे, संभाजी गोरे व तान्हाजी गोरे यांच्याविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पीएसआय कदम हे करीत आहेत.
किडनी फेल केल्याच्या कारणावरून डॉक्टरसह कुटुंबाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:33 AM